नागपूर : नागपुरातील अनेक भागात नळाला पाणी येत नसल्याने टँकर ने पाणीपुरवठा करावा लागतोय. नागपूर महापालिकेकडून (Nagpur Muncipal Corporation) २४ बाय सात पाणीपुरवठ्याचा दावा करण्यात येतो. मात्र, यंदाच्या उन्हाळ्यात मनपाचा हा दावा फोल ठरलाय. सध्या नागपूरातील अनेक भागात भीषण पाणीटंचाई (Water Shortage In Nagpur) आहे. तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा असूनही पाणी वितरणाचं योग्य नियोजन नसल्याने, सध्या नागपूरकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय.
हे देखील पाहा :
नागपूरात यंदा धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. मात्र, तरीही एप्रिल महिन्यातच अनेक भागांमध्ये पाणी टंचाई निर्माण झालीय. त्यामुळं टँकरने (Tanker) पाणीपुरवठा करावा लागतोय. अनेक भागात लोक तासंतास टॅंकरची वाट पाहत असतात. एखाद्या दुष्काळी प्रदेशाप्रमाणे टॅंकर आला की नागरिक पाण्यासाठी भोवती गोळा होतात. नागपूर महानगरपालिकेनं योग्य नियोजन न केल्यामुळे नागरीकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय.
दुसरीकडे शहरातील पाणी टंचाई कृत्रिम असून टँकर लॉबीला फायदा पोहचवण्यासाठी हे केलं जात असल्याचा आरोप भाजपने (BJP) केलाय. आमच्या काळात ऐवढे टँकर नव्हते, मात्र प्रशासन आल्यावर टँकर वाढले असून यात भ्रष्टाचार (Corruption) होतोय. याची चौकशी करून सामान्यांना पाणी मिळावं अशी मागणी भाजपचं महापालिकेतील माजी सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी केलाय. शहरातील पाणी टंचाई हा गंभीर मुद्दा आहे. टँकर लॉबी साठी ही टंचाई निर्माण केली जात असेल तर नक्कीच चौकशी करण्याची गरज आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.