चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राची विक्रमी कामगिरी

गेल्या २३ दिवसांपासून सातही संचांमधून अखंड वीजनिर्मिती साध्य करीत आजवरची विक्रमी कामगिरी केली आहे.
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राची विक्रमी कामगिरी
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राची विक्रमी कामगिरीSaamTVnews
Published On

चंद्रपूर : राज्यात उन्हाळ्याची तीव्रता व त्या अनुषंगाने विजेच्या मागणीत सातत्याने वाढ होत असताना महानिर्मितीच्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने अतिशय मोलाची कामगिरी बजावली आहे. गेल्या २३ दिवसांपासून सातही संचांमधून अखंड वीजनिर्मिती साध्य करीत आजवरची विक्रमी कामगिरी केली आहे. सद्यःस्थितीत चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राची स्थापित क्षमता 2920 मेगावॅट इतकी आहे. चंद्रपूर येथे ५०० मेगावॅटचे एकूण ५ संच व २१० मेगावॅटचे २ संच कार्यरत आहेत.

हे देखील पाहा :

४ एप्रिलपासून आजतागायत या सातही संचांमधून गेले २4 दिवस सलग अहोरात्र वीजनिर्मिती सुरु आहे. एक एप्रिल ते २५ एप्रिल २०२२ या काळात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राने एकूण 1334 दशलक्ष युनिट्स वीजनिर्मिती केली आहे. अखंड वीजनिर्मितीतील चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राची ही आजवरची विक्रमी कामगिरी आहे. या आधीच्या विक्रमानुसार डिसेंबर २०१८ मध्ये चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील सर्व संच सलग २१ दिवस कार्यरत होते. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र हे देशातीलच नव्हे तर आशियातील एक महत्वाचे महाऔष्णिक वीज केंद्र आहे. 

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राची विक्रमी कामगिरी
महागाईच्या निषेधार्थ, मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसचे भोंगा आंदोलन

या विद्युत निर्मिती केंद्राने आजवर वीज निर्मितीचे अनेक विक्रम नोंदविले असून महानिर्मितीच्या एकूण औष्णिक वीजनिर्मितीत नेहमीच सिंहाचा वाटा उचलला आहे.  ही विक्रमी कामगिरी चंद्रपूर येथील सर्व संचांची देखभाल-दुरुस्तीची कामे नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आल्याने झाली आहे. उपलब्ध कोळसा साठ्याचा जबाबदारीने वापर यामुळेच ही कामगिरी शक्य झाली आहे.  विशेष म्हणजे महानिर्मितीच्या सातही वीजनिर्मिती केंद्रांमध्ये चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातून निर्माण होणारा विजेचा दर हा सर्वांत स्वस्त असून तिथून जास्तीत जास्त वीजनिर्मिती साध्य झाल्याने राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com