नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मुख्य चौकात पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ व महागाईच्या (Inflation) निषेधार्थ मोदी सरकारच्या (Modi Government) विरोधात भोंगा आंदोलन करण्यात आले.
हे देखील पाहा :
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जाहीर भाषणांमध्ये नागरिकांना "पेट्रोल के दाम कम हुऐ की नहीं हुए? आप के जब में थोडा बहुत पैसा बचने लगा की नही बचने लगा? असे प्रश्न विचारले होते. त्या भाषणाच्या क्लिप भोंग्यामध्ये वाजवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारलेल्या प्रश्नांवर काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांनी 'नाही' असे उत्तर देत हे भोंगा आंदोलन केले.
पेट्रोल (Petrol), डिझेल (Diesel), गॅस दरवाढ आणि महागाई आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकार असमर्थ ठरत असून जनतेला दिलेलं वचन भाजप सरकार पाळू शकलेले नाही. त्यामुळे त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. जनतेची दिशाभूल करणाऱ्या मोदी सरकारचा काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार निषेध करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.