टीम इंडियानंतर आता IPLमधूनही हा अनुभवी क्रिकेटपटू आऊट

आयपीएलने नेहमीच अनेक खेळाडूंचे करिअर घडवले आहे
IPL 2022 Latest Marathi News
IPL 2022 Latest Marathi NewsSaam Tv
Published On

वृत्तसंस्था: जगात सर्वात मोठी क्रिकेट लीग IPL चा 15 वा हंगाम सध्या भारतात खेळला जात आहे. यामध्ये जगभरातील खेळाडू आपली कलाकारी दाखवताना दिसत आहेत. आयपीएलने नेहमीच अनेक खेळाडूंचे करिअर घडवले आहे आणि त्यांना त्यांच्या देशाच्या संघात महत्वाचे स्थान मिळवण्याची संधी मिळाली आहे. पण टीम इंडियाचा एक खेळाडू असा आहे ज्याची आयपीएल (IPL) कारकीर्दही बरबादीच्या उंबरठ्यावर उभी आहे. (IPL 2022 Latest Marathi News)

टीम इंडियाचा (Team India) दिग्गज फलंदाज अजिंक्य रहाणे हा आहे. आधीच टीम इंडियातून बाहेर पडलेल्या रहाणेला आता त्याची आयपीएल कारकीर्दही संपुष्टात येण्याचा धोका आहे. या मोसमात KKR संघात सामील झालेल्या रहाणेला यापुढे प्लेइंग 11 मध्ये संधी दिली जाणार नाही. हा खेळाडू पहिल्या काही सामन्यांमध्ये दिसला होता, पण आता त्याच्या जागी इतर फलंदाज आले आहेत.

हे देखील पाहा-

रहाणेला या मोसमात केकेआरकडून (KKR) केवळ 5 सामने खेळण्याची संधी मिळाली होती. आणि त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले आहे. रहाणेने या मोसमात 5 सामन्यामध्ये केवळ 80 धावा केल्या आणि त्यांच्यामुळे केकेआर संघाला त्रास सहन करावा लागला आहे. त्यानंतर रहाणेच्या जागी आरोन फिंचची निवड करण्यात आली आणि त्यानंतर आता सुनील नरेन आणि सॅम बिलिंग्स यांना संधी देण्यात आली आहे. आता संपूर्ण मोसमात या खेळाडूला पुन्हा संधी मिळणार नाही, असे मानले जात आहे.

IPL 2022 Latest Marathi News
शेअर बाजारात तेजीचे संकेत; सेन्सेक्स 476 अंकानी वधारला

टीम इंडियातही संधी मिळत नाही

अजिंक्य रहाणे आधीच टीम इंडियातून बाहेर आहे. निवड समितीने त्याला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत संधी दिली नाही. त्याच्याकडून कसोटी संघाचे उपकर्णधारपदही काढून घेण्यात आले आहे.आयपीएल 2022 मध्ये रहाणे चांगली कामगिरी करून टीम इंडियात पुनरागमन करेल, असे मानले जात होते. मात्र, या परिस्थितीत त्याचे टीम इंडियात पुनरागमन होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. या खेळाडूची लक्षणीय कारकीर्द आता शेवटच्या दिशेने वळली आहे.

आयपीएलमधील कारकीर्द अशीच होती

अजिंक्य रहाणेने जगातील सर्वात मोठ्या T20 लीग IPL मध्ये 153 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 31.53 च्या सरासरीने आणि 121 च्या स्ट्राइक रेटने 3941 धावा केल्या आहेत. तो पूर्वी मर्यादित षटकांचा चांगला फलंदाज मानला जात होता. परंतु, कालांतराने तो केवळ कसोटी क्रिकेटमध्येच राहिला. आता कसोटी संघातूनही बाहेर पडल्यानंतर या खेळाडूच्या कारकिर्दीवर संकट आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com