वृत्तसंस्था: सलग २ दिवसाच्या घसरणीनंतर शेअर मार्केटमध्ये (Share Market) आज सकारात्मक ओपनिंग दिले आहे. आज मंथली एक्सपायरीच्या दिवशी शेअर मार्केटमध्ये चांगली सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक आज हिरव्या चिन्हात सुरु झाले आहेत. सेन्सेक्स ४७६.९२ अंकांनी वधारून ५७०१९.९१ वर सुरु झाला तर निफ्टी १५१.१ अंकांनी वधारून १७,१८९.५० वर सुरु झाला आहे. (Share Market Latest News Updates)
हे देखील पाहा-
बुधवारी परत एकदा सर्वच सेक्टरमधील विक्रीदरम्यान बेंचमार्क इंडेक्समध्ये सुमारे एक टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. कमकुवत जागतिक बाजारपेठमध्ये भारतीय शेअर बाजाराची (Share Market) सुरुवात नकारात्मक झाली आहे. यानंतर दुपारच्या सत्रामध्ये विक्री वाढली. सेन्सेक्स ५३७.२२ अंकांनी म्हणजेच ०.९४ टक्क्यांनी घसरून ५६,८१९.३९ वर बंद झाला आहे.
निफ्टी १६२.४० अंकांनी म्हणजेच ०.९४ टक्क्यांनी घसरून १७,०३८.४० वर बंद झाला आहे. आज शेअर मार्केटमध्ये (Share Market) ऑईल अॅण्ड गॅस, एनर्जी, मेटलच्या स्टॉक्समध्ये तेजी दिसत आहे. मीडिया क्षेत्रात स्टॉक्स वगळता इतर सर्व क्षेत्रामध्ये स्टॉक्स वधारले आहेत. ऑईल अॅण्ड गॅसच्या शेअरमध्ये १.०७ टक्के, फार्मा शेअरमध्ये १.०५ टक्क्यांची उसळण झाल्याची दिसून येत आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.