RCB चा IPL 2025 च्या अंतिम सामन्यात दमदार प्रवेश, 9 वर्षांनी IPL फायनल खेळणार

RCB Vs PBKS Eliminator 1 IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२५ च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. बंगळुरूच्या संघाने पंजाबचा ८ विकेट्स राखून पराभव केला आहे.
rcb vs pbks ipl 2025
rcb vs pbks ipl 2025x
Published On

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सवर मात करत आयपीएल २०२५ च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पराभवानंतर पंजाब किंग्स क्वालिफायर २ मध्ये खेळणार आहे. गुजरात विरुद्ध मुंबई या एलिमिनेटर सामन्यानंतर क्वालिफायर २ मध्ये पंजाबसमोर कोणता संघ येईल हे स्पष्ट होईल. क्वालिफायर १ जिंकल्याने आरसीबीच्या चाहत्यांमध्ये उत्साह आणि आनंद पाहायला मिळत आहे.

rcb vs pbks ipl 2025
RCB चे 'Top 2' मध्ये राहणे, हेच चाहत्यांच्या चिंतेचे कारण! तुम्ही फॅन असाल तर नक्की ही बातमी वाचाल

२००९, २०११ आणि २०१६ या वर्षांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने फायनलमध्ये धडक मारली होती. २०१६ नंतर तब्बल ९ वर्षांनी बंगळुरूचा संघ आयपीएलच्या फायनलमध्ये गेला आहे. बंगळुरूसमोर आयपीएल फायनलमध्ये कोणता संघ असेल हे १ जून रोजी क्वालिफायर २ सामना झाल्यानंतर कळेल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने एकहाती विजय मिळवला. आरसीबीने घेतलेला प्रत्येक निर्णय योग्य ठरला. याची सुरुवात टॉसपासून झाली. बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या इनिंगमध्ये बंगळुरूच्या गोलंदाजांनी पंजाबच्या संघाला १०१ धावांवर ऑलआउट केले.

rcb vs pbks ipl 2025
मुंबई इंडियन्सला दुहेरी धक्का! Eliminator Match पूर्वी दोन स्टार खेळाडू दुखापतग्रस्त? Video मुळे वाढलं टेन्शन

सुयश शर्मा आणि जॉश हेजलवूड यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. यश दयालने २ विकेट्स घेतल्या. पहिल्या इनिंगच्या पहिल्या ओव्हरपासून बंगळुरु पंजाबवर वरचढ ठरत असल्याचे पाहायला मिळाले. १०१ धावांवर पंजाबचे सर्व शिलेदार बाद झाले. त्यानंतर बंगळुरूचे फलंदाज मैदानात उतरले. सलामीवीर फिल सॉल्टने अर्धशतकीय खेळी केली. विराट कोहली १२ धावा, मयंक अग्रवालने १९ धावा केल्या. कॅप्टन रजत पाटीदारने विजयाचा षटकार मारला.

rcb vs pbks ipl 2025
Mumbai Indians : ...तर मुंबई इंडियन्स बाहेर जाईल! IPL चा नियम ठरणार कर्दनकाळ, नेमकं प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com