RCB VS DC, Playing XI: रिषभ पंतच्या जागी कोणाला संधी मिळणार? RCB vs DC सामन्यासाठी अशी असेल प्लेइंग ११

RCB vs DC, Playing XI Prediction: आज होणाऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.
RCB VS DC, Playing XI:  रिषभ पंतच्या जागी कोणाला संधी मिळणार? RCB vs DC सामन्यासाठी अशी असेल प्लेइंग ११
RCB vs DC Playing XI Prediction rishabh pant replacement rcb vs dc playing 11 news in marathi amd2000twitter

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ६२ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. हा सामना गमावल्यास दिल्लीचा संघ बाहेर पडेल. तर असंच काहीसं समीकरण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासाठी असणार आहे.

या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या सामन्यात षटकांची गती राखून न ठेवल्याने रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. त्याच्याऐवजी अक्षर पटेलवर नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रिषभ पंतऐवजी पृथ्वी शॉ चा प्लेइंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो.

RCB VS DC, Playing XI:  रिषभ पंतच्या जागी कोणाला संधी मिळणार? RCB vs DC सामन्यासाठी अशी असेल प्लेइंग ११
IPL 2024 Points Table: KKR चा प्लेऑफमध्ये प्रवेश! मुंबईच्या पराभवाने या संघांचं टेन्शन वाढलं

आरसीबीची प्लेइंग ११ बदलणार?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाबद्दल बोलायचं झालं, तर ६ सामने गमावल्यानंतर या संघाने दमदार कमबॅक केलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला जर प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल, तर आज होणाऱ्या सामन्यात विजय मिळवणं गरजेचं असणार आहे. गेल्या सामन्यात या संघाने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात प्लेइंग ११ मध्ये बदल होण्याची शक्यता खूप कमी आहे.

RCB VS DC, Playing XI:  रिषभ पंतच्या जागी कोणाला संधी मिळणार? RCB vs DC सामन्यासाठी अशी असेल प्लेइंग ११
CSK vs RR, IPL 2024: चेन्नई - राजस्थान सामन्यावर पावसाचं सावट? सामना रद्द झाल्यास काय होणार?

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११..

फाफ डू प्लेसिस (कर्णधार) विराट कोहली,विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमरुन ग्रीन, दिनेश कार्तिक,स्वप्निल सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्यूसन, यश दयाल।

इम्पॅक्ट प्लेयर: महिपाल लोमरोर

दिल्ली कॅपिटल्स- जेक फ्रेजर मॅकगर्क, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, डेविड वॉर्नर/शाई होप, ट्रीस्टन स्टब्स, गुलबदीन नायब/झाय रिचर्डसन, अक्षर पटेल (कर्णधार) रसिख सलाम, कुलदीप यादव,मुकेश कुमार, खलिल अहमद

इम्पॅक्ट प्लेअर - इशांत शर्मा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com