RCB vs CSK: RCB च्या विजयानंतर फॅन्सचा स्टेडियमबाहेर राडा; चेन्नईच्या फॅन्सला घेरलं अन्... - Video

RCB Fans vs CSK Fans Viral Video: बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.
RCB vs CSK: RCB च्या विजयानंतर फॅन्सचा स्टेडियमबाहेर राडा; चेन्नईच्या फॅन्सला घेरलं अन्... - Video
rcb fans mocked and harrased csk fans after royal challengers bengaluru vs chennai super kings match watch video amd2000twitter

बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने २० षटकअखेर ५ गडी बाद २१८ धावा केल्या.

या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाला २० षटकअखेर ७ गडी बाद १९१ धावा करता आल्या. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने २७ धावांनी विजय मिळवला. दरम्यान या सामन्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ्याच्या फॅन्सचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा होता. कारण दोघांपैकी १ संघ पुढे जाणार होता. तर एका संघाचा प्रवास इथेच थांबणार होता. त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडू हा सामना जिंकण्यासाठी जोर लावताना दिसून आले. शेवटी बाजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मारली.

RCB vs CSK: RCB च्या विजयानंतर फॅन्सचा स्टेडियमबाहेर राडा; चेन्नईच्या फॅन्सला घेरलं अन्... - Video
RCB vs CSK, IPL 2024: फाफ डू प्लेसिस आऊट होता की नॉट आऊट? नेमकं काय घडलं?- Video

मैदानाबाहेर फॅन्सचा राडा

दोन्ही संघांना सपोर्ट करण्यासाठी हजारो प्रेक्षकांनी मैदानावर हजेरी लावली होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्लेऑफमध्ये प्रवेश केल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील फॅन्स एकच जल्लोष साजरा करताना दिसून आले. यादरम्यान त्यांनी चेन्नई सुपर किंग्ज संघांच्या फॅन्सच्या भावनांशी खेळ केल्याचे पाहायला मिळाले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या काही फॅन्सने चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या फॅन्सची कार अडवली आणि त्यांना चिडवल्याचा प्रकार घडला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

RCB vs CSK: RCB च्या विजयानंतर फॅन्सचा स्टेडियमबाहेर राडा; चेन्नईच्या फॅन्सला घेरलं अन्... - Video
Ruturaj Gaikwad Statement: चेन्नईचं नेमकं चुकलं तरी कुठं? कर्णधार ऋतुराज गायकवाडने सांगितली पराभवाची कारणं

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने २० षटकअखेर २१८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाला २० षटकअखेर १९१ धावा करता आल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com