R Ashwin IPL Retirement: रव‍िचंद्रन अश्व‍िनचा मोठा निर्णय; IPL मधून घेतली निवृत्ती

R Ashwin IPL Retirement: टीम इंडियाच्या चाहत्यांना आणि क्रिकेटप्रेमींना एक मोठा धक्का बसला आहे. दिग्गज स्पिनर गोलंदाज आर अश्विनने आयपीएलमधून निवृत्ती घेतल्याची माहिती समोर आली आहे.
R Ashwin IPL Retirement
R Ashwin IPL Retirementsaam tv
Published On

टीम इंडियाचा स्टार प्लेअर रविचंद्रन अश्विनने चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. अश्विनने इंडियन प्रिमियर लीगमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दिग्गज स्पिनर अश्विनने स्पष्ट केलंय की, आता तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. यानंतर अश्विन आता जगभरात खेळवल्या जाणाऱ्या विविध टी-२० फ्रेंचायजी लीग्समध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू आणि चेन्नई सुपर किंग्सचा स्टार गोलंदाज रविचंद्रन अश्विननं एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानं आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली असून आता तो आयपीएल 2026 मध्ये खेळताना दिसणार नाही. अश्विननं एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिली आणि आपल्या चाहत्यांचे तसेच संघाचे आभार मानले.

अश्विन आयपीएल 2025 मध्ये सीएसकेसाठी खेळला होता. मात्र त्याला फारसे सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याला टीमतून रिलीज करण्याच्या चर्चाही सुरू होत्या. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम देत अश्विननं स्वतःहून आयपीएलला अलविदा म्हणत निवृत्ती जाहीर केली.

R Ashwin IPL Retirement
Cricket museum: वानखेडे स्टेडियममध्ये MCA शरद पवार क्रिकेट म्युझियमचं उद्धाटन; केव्हा होणार सर्वसामान्यांसाठी खुलं पाहा

निवृत्तीची घोषणा करताना अश्विनने लिहिलंय की, “आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे आणि त्यामुळे ही नवी सुरुवात आहे. म्हणतात ना, प्रत्येक शेवट म्हणजे एका नव्या प्रवासाची सुरुवात असते. आयपीएल खेळाडू म्हणून माझा प्रवास आज संपतो आहे, पण जगभरातील विविध लीगमध्ये खेळाडू म्हणून नवा प्रवास आजपासून सुरू होतो आहे. या प्रवासात मिळालेल्या सुंदर आठवणींसाठी आणि नात्यांसाठी मी सर्व फ्रँचायझींचे आभार मानतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे @IPL आणि @BCCI यांचे, त्यांनी मला आतापर्यंत दिलेल्या संधींसाठी मी त्यांचा ऋणी आहे. आता पुढे काय येतंय त्याचा पुरेपूर आनंद घेण्याची आणि त्याचा फायदा करून घेण्याची उत्सुकता आहे.”

R Ashwin IPL Retirement
वर्ल्डकप फायनलमध्ये युवराजच्या आधी धोनीला बॅटिंगला का पाठवलं? सचिन तेंडुलकरनं सांगितली कारणं

अश्विनचा आयपीएल प्रवास

2009 साली चेन्नई सुपर किंग्सकडून पदार्पण करणाऱ्या अश्विनने आयपीएलमध्ये तब्बल 221 सामने खेळले आहेत. आपल्या ऑफ-स्पिन गोलंदाजीने त्याने 7.20 या सरासरी इकॉनॉमी रेटने 187 विकेट्स पटकावले आहेत. केवळ गोलंदाजीच नाही तर फलंदाजीतही त्याने हातभार लावला आहे. एका अर्धशतकासह अश्विननं 833 रन्स केले आहेत.

R Ashwin IPL Retirement
Team India : भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ! गंभीरनंतर आता धोनीवर ऑलराउंडरचा धक्कादायक आरोप

38 वर्षांच्या अश्विनने आयपीएलमध्ये पाच टीम्सचं प्रतिनिधित्व केलं आहे. ज्यामध्ये सीएसके, राइजिंग पुणे सुपरजायंट्स, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांचा समावेश आहे. 2010 आणि 2011 मध्ये चेन्नई सुपर किंग्सनं जिंकलेल्या आयपीएल जेतेपदामध्ये तो महत्त्वाचा खेळाडू ठरला होता. आयपीएल 2025 हंगामात तो पुन्हा सीएसकेकडून खेळला होता.

R Ashwin IPL Retirement
BCCI चं १२५ कोटी रुपयांचं नुकसान; Dream ११ नंतर आणखी एका कंपनीने साथ सोडली?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com