

Cricket News : टीम इंडियातून वगळण्यात आलेल्या पृथ्वी शॉने धमाकेदार खेळी खेळत डबल सेन्चुरी ठोकली आहे. पृथ्वी शॉ सध्या इंग्लंडमध्ये नॉर्थम्प्टनशायरकडून रॉयल वनडे स्पर्धेमध्ये खेळत आहे. सॉमरसेटविरुद्धच्या सामन्यात पृथ्वीने चौकार, षटकार मारत गोलंदाजांची अक्षरश: धुलाई केली. आजच्या सामन्यात पृथ्वीने लिस्ट ए मधील त्याची सर्वोत्तम खेळी केली. पृथ्वीच्या फटकेबाजीच्या जोरावर नॉर्थहॅम्प्टनशायरने 50 षटकांत 8 गडी गमावून 415 धावांचा डोंगर उभारला आहे.
पृथ्वी शॉने 153 चेंडूंत 28 चौकार आणि 11 षटकारांच्या मदतीने 244 धावा केल्या. लिस्ट ए क्रिकेटमधली ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. इंग्लंडच्या लिस्ट ए मधील फलंदाजाची दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके झळकावण्यात पृथ्वी रोहित शर्मानंतर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. (Latest Marathi News)
लिस्ट ए मध्ये रोहित शर्माने तीन द्विशतक झळकावली आहेत. तर पृथ्वी शॉचे लिस्ट ए क्रिकेटमधील आजचे दुसरे द्विशतक आहे. मात्र इंग्लंडमधील लिस्ट ए क्रिकेटमध्ये एखाद्या भारतीयाची 244 ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. याशिवाय पृथ्वी वन डे कपमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 207 धावा करत हा विक्रम केला. (Latest sports updates)
पृथ्वी शॉला टीम इंडियात संधी मिळाली पण त्याची संघाबाहेर फटकेबाजी सुरु आहे. पृथ्वी शॉने टीम इंडियासाठी 5 कसोटी सामन्यात 339 धावा, 6 एकदिवसीय सामन्यात 189 धावा आणि एका T20 सामन्यात 0 धावा केल्या आहेत. या खराब कामगिरीमुळे त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले आहे. मात्र 2021 पासून त्याला टीम इंडियामध्ये अजूनही संधी मिळाली नाही.
आयपीएलमध्ये पृथ्वी दिल्लीकडून खेळतो. 2023 साली ऋषभ पंतला दुखापत झाल्यानंतर तो संघाचा नवा कर्णधार होऊ शकतो, असे मानले जात होते. मात्र संघ व्यवस्थापनाने डेव्हिड वॉर्नरकडे संघांची धुरा सोपवली. शॉच्या नेतृत्वाखाली भारताने 2018 मध्ये अंडर-19 विश्वचषकही जिंकला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.