

भारतात यावर्षी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना ५ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.
तर भारत- पाकिस्तान यांच्यातील हाय व्हॉल्टेज सामना १५ ऑक्टोबर रोजी याच मैदानावर खेळवला जाणार होता. मात्र आयसीसीने या सामन्याची तारीख बदलली आहे. नुकताच सुधारीत वेळापत्रकाची घोषणा केली आहे.
भारत- पाकिस्तान हा सामना ठरलेल्या वेळापत्रकानूसार हा सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या मैदानावर खेळवला जाणार होता.
आता या वेळापकत्रकात बदल करण्यात आला आहे. हा सामना आता १४ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यात बदल केल्यामुळे इतर सामन्यांवर देखील परिणाम झाला आहे. इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात होणारा सामना १४ ऑक्टोबर रोजी १५ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.
या सामन्यांच्या तारखांमध्ये बदल..
पाकिस्तान विरूद्ध श्रीलंका यांच्यातील सामना १२ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार होता. आता हा सामना १० ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.
तर ऑस्ट्रेलिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका याच्यांतील सामना १२ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार होता. आता सुधारीत वेळापत्रकानूसार हा सामना १३ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.
भारत -पाकिस्तान सामन्याचा इम्पॅक्ट न्यूझीलंड विरूद्ध बांगलादेश यांच्यात होणाऱ्या सामन्यावर देखील झाल्याचे पाहायला मिळाले आहे. १४ ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या मैदानावर होणारा सामना हा आता १३ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. (Latest sports updates)
डबल हेडर सामन्यांमध्ये बदल..
डबल हेडर सामन्यांमध्ये ३ मोठे बदल करण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलिया विरूद्ध पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील डबल हेडरचा सामना १२ नोव्हेंबर ऐवजी ११ नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. तर स्पर्धेतील पहिला सामना ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे ५ ऑक्टोबर रोजी आणि अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी रंगणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.