Hardik Pandya News: हार्दिक पंड्या मॅच विनिंग षटकारामुळे ठरतोय व्हिलन; नेमकं सामन्यात काय घडलं?

Hardik Pandya News: भारताने सामना जिंकल्यानंतरही हार्दिक पंड्यावर प्रचंड टीका केली जाते आहे.
Hardik Pandya
Hardik Pandyasaam tv
Published On: 

Hardik Pandya News: टीम इंडियाने काल वेस्ट इंडिजवर मात केली. मात्र, काल भारताने सामना जिंकल्यानंतर हार्दिक पंड्यावर प्रचंड टीका केली जाते आहे. त्याने ठोकलेल्या विजयी षटकारामुळे त्याच्यावर टीका केली जात आहे. पंड्याच्या षटकारावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. (Latest Marathi News)

पंड्याने षटकार ठोकल्यानंतर सध्या ट्वीटर आणि फेसबुकवर अनेकांनी हार्दिक पंड्याला चांगलंच सुनावलं आहे. नेमका हा षटकार पाहून लोकांना धोनीने डिफेंड केलेला तो बॉल का आठवला.

जेव्हा विराट कोहली हा नॉन स्ट्राईकर एन्डवर होता! एक शॉर्ट बॉल धोनीसमोर येतो. धोनी आरामात या बॉलवर पुल शॉट खेळू शकला असता. पण तेव्हा त्याने तो बॉल डिफेंड केला होता. त्यानंतर धोनीने डिफेंड केलेला हा बॉल हिरो ठरला आणि आता हार्दिक पंड्याने विजयी षटकार मारल्यानंतर नेटकऱ्यांकडून त्याला व्हिलन ठरवलं जात आहे.

Hardik Pandya
Viral Cricket Video: शोएब अख्तरसारखा धावला अन् मुरलीधरनसारखा फेकला; भावाची बॉलिंग पाहून बॅट्समनच्या डोक्याला आल्या मुंग्या- VIDEO

रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या गैरहजेरीत टीम इंडियाचं नेतृत्त्व हार्दिक पंड्या करत आहे. टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. 5 मॅचची सीरीज आहे. या सीरिजमध्ये टीम इंडियात आधीच 2-0 ने मागे आहे.

अशात तिसऱ्या मॅचमध्ये करो या मरो अशी परिस्थिती होती. या मॅचमध्ये टीम इंडिया जिंकली. आता सिरीज 2-1 अशी आहे. पण ही मॅच एका षटकारामुळे चर्चेत आली आहे. पंड्याने षटकार ठोकल्यानंतर लोकांना याचा खरंतर आनंद वाटायला हवा होता ना.. पण असं झालं नाहीये.

सामन्यात नेमकं काय घडलं?

तिलक वर्मा आपल्या कामगिरीच्या जोरावर टीम इंडियातही आपलं स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. अवघ्या 21 वर्षांचा असलेला तिलक वर्मा वेस्ट इंडिज विरुद्धच्या तीनही सामन्यात कमाल खेळला. पहिल्या मॅचमध्ये 22 बॉल्समध्ये त्याने 39 रन्स केला. दुसऱ्या मॅचमध्ये त्याने 41 बॉल्समध्ये दणदणीत 51 धावा केल्या. तर वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक मॅचमध्ये त्याने 37 बॉल्समध्ये 49 धावा केल्या होत्या.

Hardik Pandya
Viral Cricket Video: नशीबच फुटकं राव.. खणखणीत षटकार मारूनही फलंदाजाला सोडावं लागलं मैदान; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

आता तिसऱ्या मॅचमध्येही तिलक हाफ सेन्चुरी करेलच, असं सगळ्यांना वाटत होतं. पण तसं काही झालं नाही. टीम इंडियाला विजयासाठी फक्त दोन रन हवे होते. तर तिलकला हाफ सेन्चुरीसाठी १ रन. अशावेळी हार्दिक पंड्या स्ट्राईकवर होता. क्रिकेट चाहत्यांना असं अपेक्षित होतं की विजयी धावा करण्याची आणि हाफ सेन्चुरी करण्याची संधी तिलक वर्माला देईल. पण असं काही झालं नाही.

बॉल एक पंड्याच्या टप्प्यात आला आणि त्याने तो थेट समोर स्टॅन्ड्समध्ये पोहोचवला. टीम इंडिया वियजी झाल्याचा आनंद तर सगळ्यांना झाला. पण तिलक वर्माही हाफ सेन्च्युरी होऊ शकली नसल्याने नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली आहे.

Hardik Pandya
Major League Cricket: दुनिया हिला देंगे हम! IPL नंतर अमेरिकेतही मुंबईच ठरली चॅम्पियन; MLC च्या अंतिम सामन्यात मिळवला जोरदार विजय

...आणि धोनीने कोहलीलाही चकीत केलं

टीम इंडिया तेव्हा साऊथ अफ्रिकेविरुद्ध खेळत होती. ज्यात विराटने आपल्या तुफानी पारीने भारताला विजयाच्या दारात नेऊन ठेवलं होतं. पण तेव्हा स्ट्राईकवर धोनी होता. मॅच जिंकून देणाऱ्या कोहलीनेच मॅच संपवली पाहिजे, असं धोनीला वाटलं. त्याने मारण्यासारखा बॉल डिफेंड केला आणि कोहलीलाही चकीत केलंय.

मॅच तू जिंकवून दिली आहेत.. तर विनिंग रन्सही तूच काढले पाहिजे. हे धोनीनं आपल्या कृतीतून कोहलीला सांगून टाकलं आणि धोनीबाबत असलेला चाहत्यांचा आदर आणखी वाढला. अर्थात ती मॅच विराटच्या इनिंगपेक्षा धोनीच्या कृतीमुळे लक्षात राहिली.

Hardik Pandya
Cricket Viral Crush Video: फलंदाजाला बॉल लागला, ती मैदानात धावत आली अन् मोक्कार भाव खाऊन गेली

अर्थात ती मॅच विराटच्या इनिंगपेक्षा धोनीच्या कृतीमुळे लक्षात राहिली. आता वेस्ट इंडिजविरुद्धही ही मॅच... पंड्याचा षटकार हिरो न ठरता, व्हिलन होऊ लागला आहे. सोशल मीडियात त्याच्यावर प्रचंड टीका होत आहे.

एका 21 वर्षीय नवख्या खेळाडूला विनिंग रन्स मारायला देता येण हार्दिक पंड्याला बघवलं नसतं का? असा प्रश्न लोक उपस्थित करु लागले आहेत. नेटकरी पंड्याला स्वार्थी म्हणून हिणावू लागले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.