Viral Cricket Video: नशीबच फुटकं राव.. खणखणीत षटकार मारूनही फलंदाजाला सोडावं लागलं मैदान; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Six And Hit Wicket: मिडीलसेक्स विरुद्ध वार्विकशायरविरुद्ध झालेल्या सामन्यात हा प्रकार घडला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
six and wicket
six and wicketsaam tv
Published On

Viral Video: कुठल्या फलंदाजाने षटकार मारला आणि अंपायरने त्याला बाद घोषित केलं. ऐकायला थोडं वेगळं वाटतंय ना? मात्र इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काऊंटी डीव्हिजन १ लेव्हलच्या सामन्यात असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले आहे.

मिडीलसेक्स विरुद्ध वार्विकशायरविरुद्ध झालेल्या सामन्यात हा प्रकार घडला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

six and wicket
IND vs WI 3rd ODI: मालिका जिंकली, मालिकावीराचा पुरस्कारही पटकावला, तरीही ईशान किशन नाराज; सामन्यानंतर सांगितलं कारण

तर झाले असे की, मिडीलसेक्स विरुध्द वर्विकशायरविरुद्ध या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात वर्विकशायर संघाचा डाव २२.५ षटकात अवघ्या ६६ धावांवर संपुष्टात आला होता. मिडीलसेक्स संघाचा कर्णधार रोलेंड जॉस नवव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. त्यावेळी संघाची धावसंख्या ४५.१ षटकात ७ गडी बाद १४८ धावा इतकी होती.

रोलेंड जॉसने एका चेंडूवर षटकार मारला होता. अंपायरने दोन्ही हात वर करत सहा धावांचा इशारा केला होता. त्यावेळी यष्टिरक्षकाने अंपायरचं लक्ष वेधून घेतलं. शॉट मारताच बेल्स खाली पडल्याचे पाहायला मिळाले होते. (Latest sports updates)

व्हिडिओ होतोय व्हायरल...

रोलेंड जॉसने ज्यावेळी षटकार मारला, त्यावेळी चेंडू तर मैदानाबाहेर गेला होता. मात्र शॉट मारल्यानंतर त्याची बॅट स्टंपला लागली होती. त्यामुळे अंपायरने त्याला बाद घोषित केले होते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

मिडीलसेक्स संघाचा विजय..

या स्पर्धेतील १० सामन्यांपैकी हा मिडीलसेक्स संघाचा तिसरा विजय होता. हा सामना जिंकून मिडीलसेक्स संघ आठव्या स्थानी कायम होता. तर वार्विकशायर संघ ४ गुणांसह चौथ्या स्थानी कायम होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com