Viral Cricket Video: शोएब अख्तरसारखा धावला अन् मुरलीधरनसारखा फेकला; भावाची बॉलिंग पाहून बॅट्समनच्या डोक्याला आल्या मुंग्या- VIDEO

Funny Moments In Cricket: एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Viral Cricket Video
Viral Cricket VideoSaam Tv
Published On: 

Funniest Bowling Action:

सोशल मीडियावर असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हायरल व्हिडिओमध्ये क्रिकेटच्या व्हिडिओचा देखील समावेश असतो. टेनिस क्रिकेटमध्ये जर एखाद्या खेळाडूने भन्नाट कॅच घेतला किंवा काही मजेशीर घटना घडली तर या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Cricket Video
IND vs WI Weather Update: निर्णायक सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी!तिसरा सामना रद्द होण्याची शक्यता? हे आहे मोठं कारण

तुम्ही आतापर्यंत अनेक गोलंदाज पाहिले असतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मुथय्या मुरलीधरनची गोलंदाजी अॅक्शन ही जरा वेगळीच होती. तो शॉर्ट रनअप घेऊन गोलंदाजी करायचा. नुकताच व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक गोलंदाज वेगवान गोलंदाजासारखा धावत येऊन मुथय्या मुरलीधरन सारखा फिरकी गोलंदाजी करताना दिसून येत आहे.

मुथय्या मुरलीधरनसारखा चेंडू टाकून या गोलंदाजाने फलंदाजाची दांडी गुल केली आहे. मुख्य बाब म्हणजे फलंदाजाला कळालं सुध्दा नाही की, गोलंदाजाने नेमका कुठल्या प्रकारचा चेंडू टाकला आहे. मात्र जेव्हा त्याची दांडी गुल झाली जेव्हा तो कन्फ्युज असल्याचे दिसून आले. हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ रमेश जांगीर या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ ३ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. तर युजर्स गोलंदाजाची अॅक्शन पाहून भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे. (Latest sports updates)

टेनिस क्रिकेटची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. यापूर्वी काही मोजक्याच ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन केले जायचे. मात्र लोकप्रियता वाढल्यापासून गावागावात आणि शहरांमध्ये या स्पर्धेचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाते.

या स्पर्धांमध्ये विजयी संघांना लाखो रुपयांचे बक्षीस दिले जाते. तसेहच काही असे देखील खेळाडू आहेत ज्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये नाव कमावल्यानंतर थेट राज्याच्या संघात स्थान मिळवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.