IND vs WI Weather Update: निर्णायक सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी!तिसरा सामना रद्द होण्याची शक्यता? हे आहे मोठं कारण

India vs West Indies Weather Report: या सामन्यापूर्वी एक मोठी माहिती समोर येत आहे.
ind vs wi weather report
ind vs wi weather reportsaam tv
Published On

IND vs WI 3rd T20: भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज रंगणार आहे. हा सामना गयानातील प्रोविडेंस स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.

कारण भारतीय संघ या मालिकेत या ०-२ ने पिछाडीवर आहे. त्यामुळे आणखी एक पराभव झाल्यास भारतीय संघाला ही मालिका गमवावी लागणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी एक मोठी माहिती समोर येत आहे.

ind vs wi weather report
IND VS WI Playing 11: टीम इंडियासाठी 'करो या मरो'ची लढत! तिसऱ्या सामन्यातून 'या' प्रमुख खेळाडूंची होणार सुट्टी; पाहा प्लेइंग 11

तिसऱ्या सामन्यात पाऊस ठरणार व्हिलन?

भारतीय संघाला तिसरा टी-२० सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. मात्र या महत्वाच्या सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गयानाच्या मैदानावर सामन्याच्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता ५० टक्के इतकी असणार आहे.

तसेच सामना सुरू असताना पाऊस पडण्याची शक्यता कमी असणार आहे. ही शक्यता २४ टक्के इतकी असणार आहे. तर वातावरण ३२ डिग्री सेल्सियसच्या आसपास असणार आहे. (Latest sports updates)

ind vs wi weather report
IND vs WI: 'IPL सुरु झाल्यानंतर एकही वर्ल्डकप..', टीम इंडियाच्या निराशाजनक कामगिरीनंतर माजी क्रिकेटपटू भडकले

भारतीय संघासाठी 'करो या मरो' ची लढत

भारत आणि वेस्टइंडीज यांच्यातील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला ४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागल होता. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ कमबॅक करेल असे वाटत असताना भारतीय संघाला दुसऱ्या सामन्यातही २ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

त्यामुळे तिसरा सामना हा भारतीय संघासाठी 'करो या मरो' असणार आहे. भारतीय संघाने हा सामना गमावला तर भारतीय संघाला ही मालिका देखील गमवावी लागणार आहे.

या सामन्यासाठी अशी असु शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), तिलक वर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (कर्णधार), अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com