IND VS WI Playing 11: टीम इंडियासाठी 'करो या मरो'ची लढत! तिसऱ्या सामन्यातून 'या' प्रमुख खेळाडूंची होणार सुट्टी; पाहा प्लेइंग 11

Team India Playing 11: तिसरा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये काही महत्वाचे बदल पाहायला मिळू शकतात.
IND VS WI Playing 11
IND VS WI Playing 11saam tv
Published On

Team India Playing 11 For IND vs WI 3rd T20:

भारत विरुद्ध वेस्टइंडीज यांच्यातील तिसरा सामना भारतीय संघासाठी निर्णायक सामना असणार आहे. हा सामना जर भारतीय संघाने गमावला तर टी -२० मालिका देखील हातातून जाणार आहे. ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ २-० ने पिछाडीवर आहे.

तर मालिकेतील तिसरा सामना भारतीय वेळेनुसार आज रात्री ८ वाजता गयानाच्या मैदानावर रंगणार आहे. सलग २ सामने गमावल्यानंतर आता तिसरा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये काही महत्वाचे बदल पाहायला मिळू शकतात.

IND VS WI Playing 11
IND vs WI: 'IPL सुरु झाल्यानंतर एकही वर्ल्डकप..', टीम इंडियाच्या निराशाजनक कामगिरीनंतर माजी क्रिकेटपटू भडकले

वेस्टइंडीजविरुध्द होणाऱ्या तिसऱ्या टी -२० सामन्यात यशस्वी जयस्वालला पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल ही जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर येऊ शकते.

तर ईशान किशन ५ व्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांची जोडी पावरप्लेमध्ये तुफान फटकेबाजी करून संघाला चांगली सुरुवात करून देऊ शकते.

असा असेल मध्यक्रम...

संघाचा उपकर्णधार सूर्यकुमार यादव या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. तर दमदार कामगिरी करत असलेला तिलक वर्मा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायला येऊ शकतो.

या सामन्यात संजू सॅमसनला विश्रांती दिली जाऊ शकते. त्यामुळे पाचव्या क्रमांकावर ईशान किशन फलंदाजीला येऊ शकतो. सतत संधी मिळूनही संजू सॅमसन मोठी खेळी करू शकला नाही. त्यामुळे या सामन्यासाठी त्याला संघात स्थान मिळणं कठीण आहे.

अष्टपैलू खेळाडू...

या सामन्यातही कर्णधार हार्दिक पंड्या ६ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना येऊ शकतो. तर अक्षर पटेलला ७ व्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी दिली जाऊ शकते.

गोलंदाज..

या सामन्यात फिरकी गोलंदाज म्हणून युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादवची जोडी खेळताना दिसून येऊ शकते. त्यामुळे रवी बिश्नोईला बाहेर बसावं लागेल. तर वेगवान गोलंदाज म्हणून हार्दिक पंड्या मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंगला संधी देऊ शकतो. त्यामुळे आवेश खान आणि उमरान मलिकला बाहेर बसावं लागेल. (Latest sports updates)

IND VS WI Playing 11
IND VS WI: संघाबाहेर असूनही किंग कोहली का होतोय ट्रेंड? टीम इंडियाच्या पराभवाचं अन् विराटचं काय आहे कनेक्शन; जाणून घ्या

अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११..

यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), तिलक वर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (कर्णधार), अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com