

Narendra Modi Speech: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना ते फ्रान्समध्ये असलेल्या अनिवासी भारतीयांशी संवाद साधताना दिसून आले आहेत.
यादरम्यान त्यांनी फ्रान्सला २०१८ फिफा वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या किलीयन एम्बाप्पेचे तोंडभरून कौतुक केले आहे. यादरम्यान त्यांनी दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररचा देखील उल्लेख केल्याचे पाहायला मिळाले आहे. (Narendra modi on kylian mbappe)
भारत आणि फ्रान्समधील संबंधांबद्दल बोलताना पंतप्रधान मोदींनी एम्बाप्पेचे कौतुक केले आहे. नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, 'एम्बाप्पेचे जेवढे फॅन्स फ्रान्समध्ये नसतील, तेवढे फॅन्स भारतातील खेड्यापाड्यांमध्ये आहेत.'असं ते म्हणाले.
फ्रान्सला जिंकून दिलाय वर्ल्डकप..
किलीयन एम्बाप्पे हा जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. २०१८ मध्ये तो विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा सदस्य होता. यासह २०२२ मध्ये देखील फ्रान्सने फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.
यावेळी देखील एम्बाप्पेने फ्रान्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र अंतिम सामन्यात या संघाला अर्जेंटिना संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात किलीयन एम्बाप्पेने ३ गोल केले होते. (Latest sports updates)
तो पॅरिस सेंट जर्मन संघाचे प्रतिनिधित्व करतो. लिओनेल मेस्सी आणि नेमार सारख्या खेळाडूंनी देखील या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र सध्या पॅरिस सेंट जर्मन आणि किलियन एम्बाप्पे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. २०२४ मध्ये एम्बाप्पेचा पॅरिस सेंट जर्मनसोबत असलेला करार संपणार आहे. त्याला रिअल माद्रिद संघाकडून मोठी ऑफर मिळाली आहे. त्यामुळे तो या संघाकडून खेळणार असल्याची चर्चा सुरु आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.