Yashasvi Jaiswal Records: गावसकर अन् सेहवागलाही नाही जमलं ते यशस्वीने करून दाखवलं! असा कारनामा करणारा ठरला पहिलाच फलंदाज

Records Made By Yashasvi Jaiswal: वेस्टइंडीजविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वालने जोरदार शतक झळकावले आहे.
yashasvi jaiswal
yashasvi jaiswal saam tv
Published On

IND vs WI 1st Test: वेस्टइंडीजविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वालने जोरदार शतक झळकावले आहे. या सामन्यात त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. पदार्पणाच्या सामन्यात त्याने रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करताना विक्रमी भागीदारी केली.

दरम्यान शतकी खेळी करत त्याने असा काही पराक्रम केला आहे जो दिग्गज फलंदाज सुनील गावसकर आणि वीरेंद्र सेहवागला देखील जमला नव्हता.

yashasvi jaiswal
Yashasvi Jaiswal Century: मुंबईकर जयस्वालचं यशस्वी शतक! तुफानी खेळी करत मोडले 'हे' मोठे रेकॉर्डस्...

यशस्वी जयस्वालच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद..

डॉमिनिकाच्या मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात युवा फलंदाज यशस्वी जयस्वालला डावाची सुरुवात करायची संधी मिळाली. या संधीचं सोनं करत त्याने पहिल्याच डावात शतक झळकावले आहे. हे शतक त्याने भारताबाहेर झळकावले आहे.

यासह पदार्पणाच्या सामन्यात भारताबाहेर शतक झळकावणारा तो पहिलाच भारतीय सलामीवीर फलंदाज ठरला आहे.

भारतीय संघाचे सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि सुनील गावसकरांना देखील हा कारनामा करता आला नव्हता. या शतकी खेळीसह तो पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावणारा १७ वा भारतीय खेळाडू ठरला आहे.

गेल्या १३ वर्षांत असा कारनामा करणारा पहिलाच फलंदाज..

भारतीय संघातील मध्यक्रमातील फलंदाज श्रेयस अय्यरने २०२१ मध्ये न्यूझीलंड संघाविरुद्व आपला पहिलाच सामना खेळताना शतक झळकावले होते. तर कर्णधार रोहित शर्माने २०१३ मध्ये वेस्टइंडीज संघाविरुद्व झालेल्या पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने जोरदार शतक झळकावले होते. (Yashasvi Jaiswal)

यशस्वी जयस्वाल हा परदेशात जाऊन पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावणारा सातवा भारतीय फलंदाज आहे.

तर गेल्या १३ वर्षांत परदेशात जाऊन शतक झळकावणारा यशस्वी हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. २०१० मध्ये सुरेश रैनाने श्रीलंकेविरुद्ध खेळताना १२० धावांची खेळी केली होती. (Latest sports updates)

yashasvi jaiswal
Yashasvi Jaiswal Emotional Statement: पदार्पणात शतक झळकावताच भावूक झाला जयस्वाल; म्हणाला,' हा क्षण माझ्यासाठी...'

रोहितसोबत विक्रमी भागीदारी..

रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी पहिल्या डावात फलंदाजी करताना विक्रमी भागीदारी केली आहे. या दोघांनी २०० पेक्षा अधिक धावांची भागीदारी करत वसीम जाफर आणि वीरेंद्र सेहवागच्या जोडीचा विक्रम मोडून काढला आहे.

वसीम जाफर आणि वीरेंद्र सेहवागने २००६ मध्ये वेस्टइंडीज संघाविरुद्व खेळताना १५९ धावांची भागीदारी केली होती. आता २२९ धावांची भागीदारी करत या जोडीने हा विक्रम मोडून काढला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com