

PBKS VS GT Match Preview: आज आयपीएल २०२३ स्पर्धेत आणखी एक रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. आज पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहे.
दोन्ही संघांना आपल्या शेवटच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये विजय मिळवण्यासाठी जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान कसे असेल पंजाबचे वातावरण जाणून घ्या.
या सामन्यात हार्दिक पंड्या आणि शिखर धवन या दोंघांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. पंजाब किंग्ज संघाला सनरायझर्स हैदराबाद संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. (PBKS VS GT Weather Report)
तर गुजरात टायटन्स संघाला अंतिम षटकात कोलकाता नाईट रायडर्स संघाने पराभवाची धूळ चारली होती. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघ कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
कसे असेल आजचे हवामान?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मोहालीचे वातावरण हे साधारण असणार आहे. दिवसा तापमान ३७ डिग्री सेल्सियस इतके असेल. तर सामना सुरु असताना म्हणजे संध्याकाळी मोहालीचे वातावरण २१ डिग्री सेल्सियस इतके असणार आहे.
तर पाऊस पडण्याची शक्यता ही नाहीच्या बरोबर आहे. त्यामुळे या सामन्यावर पावसाचा कुठलाही परिणाम जाणवणार नाही. (Latest sports updates)
अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११:
PBKS Vs GT Playing XI
पंजाब किंग्स :
शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिविंगस्टन, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), शाहरुख खान, सॅम करन, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग
गुजरात टायटन्स :
वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल, यश दयाल, अल्झारी जोसेफ
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.