IPL 2023 Punjab Kings: विरोधी संघ आता थर थर कापणार! पंजाबचा वाघ संघात परतलाय..

Liam Livingstone IPL: पंजाब किंग्ज संघात धाकड खेळाडूची एंट्री झाली आहे.
Punjab Kings
Punjab KingsSaam Tv
Published On

Liam Livingstone Comeback In IPL: शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणारा पंजाब किंग्ज संघ सध्या आयपीएल २०२३ स्पर्धेत जोरदार कामगिरी करतोय. या संघाने आतापर्यंत खेळलेल्या ३ पैकी २ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

तर पंजाब किंग्ज संघाचा पुढील सामना गुजरात टायटन्स संघाविरुद्ध रंगणार आहे. या सामन्यापूर्वी पंजाब किंग्ज संघात धाकड खेळाडूची एंट्री झाली आहे.

Punjab Kings
Umpire Salary in IPL: अजिंक्य रहाणे अन् रिंकू सिंग पेक्षाही जास्त आहे अंपायरची सॅलरी! एका हंगामाचा पॅकेज ऐकून बसेल धक्का

पंजाबची फलंदाजी आता आणखी मजबूत होणार आहे. कारण इंग्लडचा स्टार फलंदाज लियाम लिविंगस्टनची पंजाब किंग्ज संघात एंट्री झाली आहे. लियाम लिविंगस्टन हा डिसेंबर २०२२ मध्ये दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला होता. आता तो दुखापतीतून पूर्णपणे सावरला असुन तो आयपीएल सज्ज झाला आहे. (Liam Livingstone)

लियाम लिविंगस्टनने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून आपण कमबॅक करत असल्याचं सांगितलं आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'काही महिने होऊन गेले मी मैदानाबाहेर आहे. लवकरच भेटू.' असे लिहून त्याने पंजाब किंग्जला टॅग केले आहे. (Latest sports updates)

Punjab Kings
Avesh Khan Celebration: एकही रन न मारता हेल्मेट तोड सेलिब्रेशन करणाऱ्या Avesh Khan ला BCCI चा दणका! केली मोठी कारवाई

लियाम लिविंगस्टन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आक्रमक फलंदाजांपैकी एक आहे. त्यामुळे पंजाब किंग्ज संघात लियाम लिविंगस्टनचे पुनरागमन झाल्याने पंजाब किंग्ज संघाची फलंदाजी आणखी मजबूत होणार आहे. हा फलंदाज एकट्याच्या जीवावर सामना जिंकून देऊ शकतो. तसेच गरज पडल्यास फिरकी गोलंदाजी देखील करू शकतो.

त्यामुळे पंजाब किंग्ज संघातील फलंदाज आणि गोलंदाजांवर असलेला दबाव आता कुठेतरी कमी होणार आहे. लियाम लिविंगस्टनच्या रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर त्याने या स्पर्धेतील १४ सामन्यांमध्ये ४३७ धावा केल्या आहेत.

Punjab Kings
Rinku Singh IPL 2023: उमेश यादवच्या 4 शब्दांचा इम्पॅक्ट अन् रिंकूने ठोकले खणखणीत 5 षटकार! काय म्हणाला उमेश यादव? वाचा

पंजाब किंग्ज संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर हंगामातील पहिल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघावर ७ धावांनी विजय मिळावला होता. तर राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामान्यात पंजाब किंग्ज संघाने ५ धावांनी विजय मिळवला होता.

मात्र सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्व झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाला ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता. गेल्या सामन्यात पराभूत झालेला पंजाब किंग्ज संघ आता पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com