Pakistan Squad: पाकिस्तानकडून १८ सदस्यीय संघाची घोषणा! टीम इंडियाला नडणाऱ्या गोलंदाजाचं कमबॅक

ICC T20 World Cup 2024: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेपूर्वी पाकिस्तानचा संघ इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध टी-२० मालिका खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.
pakistan squad announced for t20i series against england and ireland haris rauf made comeback amd2000
pakistan squad announced for t20i series against england and ireland haris rauf made comeback amd2000twitter

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेपूर्वी पाकिस्तानचा संघ इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध टी-२० मालिका खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. या मालिकेसाठी पीसीबीने १८ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. पाकिस्तानचा संघ १० मे पासून आयर्लंडविरुद्ध ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत दोन हात करताना दिसून येणार आहे. या मालिकेतून, संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज हारीस रउफ कमबॅक करताना दिसून येणार आहे. तर याच मालिकेत शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आयसीसी टी-२० वर्ल्डकपसाठी पाकिस्तान संघात स्थान दिलं जाणार आहे.

नुकताच पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. ही मालिका खेळणाऱ्या खेळाडूंचा आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तान संघात समावेश करण्यात आला आहे. ज्यात हसन अलीचा देखील समावेश आहे.तर जमान खान, उसामा मीर यांना संघाबाहेर करण्यात आलं आहे.

pakistan squad announced for t20i series against england and ireland haris rauf made comeback amd2000
IPL 2024 Points Table: चेन्नईला नमवत पंजाबची गुणतालिकेत मोठी झेप!या संघांचं टेन्शन वाढलं

बाबर आझमकडे संघाची जबाबदारी...

पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर झाला होता. तर मोहम्मद रिजावन देखील हॅम्स्ट्रींगमुळे २ सामन्यांमधून बाहेर झाला होता. इंग्लंड आणि आयरर्लंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेत पाकिस्तान संघाची जबाबदारी बाबर आझमवर असणार आहे. तर टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतही पाकिस्तान संघाची जबाबदारी बाबर आझमकडे असणार आहे.

pakistan squad announced for t20i series against england and ireland haris rauf made comeback amd2000
IPL 2024: शिवम दुबेची अफलातून फलंदाजी; या बाबतीत दिग्गजांनाही सोडलं मागे

असा आहे पाकिस्तानचा संघ:

बाबर आजम (कप्तान), अबरार अहमद, आजम खान, फखर जमान, हारिस रऊफ, हसन अली, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम,मोहम्मद रिजवान, मुहम्मद इरफान खान, नसीम शाह, सईम अयूब, सलमान अली आगा , शादाब खान, शाहीन शाह अफरीदी, उस्मान खान, मोहम्मद अब्बास अफरीदी, मोहम्मद आमिर.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com