Champions Trophy 2025: पाकिस्तान सुधरणार नाय! BCCI कडे बोट करत ICC कडे केली पैशांची मागणी; वाचा काय आहे प्रकरण?

Pakistan Cricket Board: ही स्पर्धाही हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवली जाऊ शकते. जर भारतीय संघाने ही स्पर्धा खेळण्यासाठी जाण्यास नकार दिला. तर या स्पर्धेचे आयोजन दुबईत केले जाऊ शकते.
pakistan-cricket-team
pakistan-cricket-teamsaam tv news
Published On

ICC Champions Trophy 2025 Host:

आशिया कप २०२३ स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानात खेळवली जाणार होती. मात्र भारतीय संघाने पाकिस्तानात खेळण्यासाठी जाण्यास नकार दिल्याने ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवण्यात आली होती.

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे यजमानपदही पाकिस्तानकडे आहे. मात्र ही स्पर्धाही हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवली जाऊ शकते. जर भारतीय संघाने ही स्पर्धा खेळण्यासाठी जाण्यास नकार दिला. तर या स्पर्धेचे आयोजन दुबईत केले जाऊ शकते.

या स्पर्धेतील सामने दुबईत खेळवले जाऊ शकतात. ही स्पर्धा जर हायब्रिड मॉडेलनूसार खेळवली गेली तर भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत खेळवले जातील. तर इतर संघांचे सर्व सामने पाकिस्तानात खेळवले जातील. भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला, तर अंतिम फेरीचा सामना देखील दुबईत खेळवला जाईल.

आशिया कप स्पर्धेचं यजमानपदही गेलं..

आशिया कप स्पर्धा पाकिस्तानात खेळवली जाणार होती. मात्र भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे भारतीय संघाचे सामने श्रीलंकेत खेळवले गेले होते. यावेळी ही भारतीय संघ पाकिस्तानात जाण्यावर प्रश्नचिन्ह आहे.

त्यामुळे दाट शक्यता वर्तवली जात आहे की, भारतीय संघाचे सामने दुबईत खेळवले जातील. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (Latest sports updates)

pakistan-cricket-team
IND vs AUS, Playing XI: ऑस्ट्रेलिया कमबॅक करणार की टीम इंडिया मालिका जिंकणार? पाहा संभाव्य प्लेइंग ११ अन् पिच रिपोर्ट

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे असलं तरीदेखील आयसीसीने अजूनही शिक्कामोर्तब केलेलं नाही. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डने यजमानपदाच्या करारावर स्वाक्षरी करण्याची मागणी केली आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की, सुरक्षेच्या कारणास्तव आशिया कपप्रमाणेच भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात येण्यास नकार देईल. जर असं झालं तर नुकसान भरपाई मिळावी असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डचं म्हणणं आहे.

pakistan-cricket-team
IND vs AUS Weather: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी-20 होणार रद्द? समोर आलं मोठं कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com