Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार का?

Champions Trophy 2025: या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानात केले जाणार आहे.
team india
team indiasaam tv news
Published On

Champions Trophy 2025:

भारतात सध्या वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार सुरु आहे. आयसीसीने २०३१ पर्यंत होणाऱ्या आयसीसीच्या स्पर्धांची यादी जाहीर केली आहे. ठरलेल्या वेळापत्रकानुसार येत्या २०२४ मध्ये टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचा थरार सुरू आहे. त्यानंतर २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा थरार रंगणार आहे. पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानात केले जाणार आहे.

आशिया चषक २०२३ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. मात्र बीसीसीआयने पाकिस्तानात जाऊन खेळण्यास स्पष्ट नकार कळवला होता. हा वाद काही महिने सुरुच होता. अखेर पाकिस्तानला बीसीसीआयसमोर झुकावं लागलं होतं. या स्पर्धेचे आयोजन हायब्रिड मॉडेलमध्ये करण्यात आले होते. त्यामुळे या स्पर्धेतील सामने पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळवण्यात आला होते.

सध्या सुरु असलेली वर्ल्डकप स्पर्धा भारतात खेळवली जात आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ भारतात दाखल झाला आहे. यावेळी पाकिस्तानने भारतात येण्यासाठी नकार कळवला होता. यावेळी आयसीसीने दबाव टाकल्यामुळे पाकिस्तानला भारतात यावं लागलं आहे.

team india
IND vs ENG: बॉल ऑफ द वर्ल्डकप! कुलदीपनं शेन वॉर्न सारखाच बॉल फिरवत घेतली बटलरची विकेट; पाहा Video

भारतीय संघ पाकिस्तानात जाणार का?

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे असेल तरीदेखील भारतीय संघ ही स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानात जाण्याची शक्यता खुप कमी आहे.कारण आशिया चषक स्पर्धेच्या वेळीही बीसीसीआयने पाकिस्तानात जाण्यास स्पष्ट नकार दिला होता. अशा स्थितीत भारतीय संघाचे सामने हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवले जाऊ शकतात. त्यामुळे भारतीय संघाच्या सर्व सामन्यांचे आयोजन पाकिस्तानऐवजी श्रीलंकेत किंवा यूएईत केले जाऊ शकते. (Latest sports updates)

team india
World Cup Points Table: दुगना लगान वसूल! इंग्लंडला लोळवून टीम इंडिया पहिल्या स्थानी; कोण टॉप ४ मध्ये, कोण बाहेर जाणार? पाहा पॉइंट टेबल

८ संघांना मिळेल प्रवेश..

आयसीसीने २०२१ मध्ये स्पष्टपणे सांगितंल होतं की, २०२५ आणि २०२९ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत ८ संघांना एन्ट्री मिळणार आहे. ४-४ संघ २ गटांमध्ये विभागले जातील त्यानंतर उपांत्य फेरीचे आणि अंतिम फेरीचे सामने खेळवले जातील. सध्या सुरु असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंड आणि बांगलादेशचा संघ नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहे.

या स्पर्धेत नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर असलेल्या संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत प्रवेश मिळणार नाही. या दोन्ही संघांसह झिम्बाब्वे, आयर्लंड आणि वेस्टइंडीज या संघांनाही प्रवेश मिळणार नाही. कारण हे संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतही प्रवेश मिळवू शकले नव्हते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com