

न्यूझीलंड आणि नेदरलँड या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप स्पर्धेतील सहावा सामना सुरू आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात नेदरलँडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत घेतला. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडला ५० षटकअखेर ७ गडी बाद ३२२ धावा करता आल्या आहेत. तर नेदरलँडला हा सामना जिंकण्यासाठी ५० षटक अखेर ३२३ धावा करायच्या आहेत.
न्यूझीलंडने उभारला ३२२ धावांचा डोंगर
या सामन्यात डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाकडून डेवोन कॉनवे आणि विल यंग यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली होती. दोघांनी ७० धावांची भागीदारी केली. डेवोन कॉनवे ३२ तर विल यंग ७० धावा करत माघारी परतला.
गेल्या सामन्यातील शतकवीर रचिन रविंद्रने या सामन्यात ५१ चेंडूंचा सामना करत ५१ धावा केल्या. तर डॅरील मिशेल ४८ धावा करत माघारी परतला. शेवटी संघाचा कर्णधार टॉम लेथमने संघाची जबाबदारी स्विकारत अर्धशतकी खेळी केली. (Latest sprots updates)
नेदरलँड संघातील गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर,पॉल व्हॅन मीकरेनने २ गडी बाद केले. तर वॅन डर मार्वेने २ गडी बाद केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.