

MS Dhoni Viral Photo: भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरीदेखील त्याची लोकप्रियता काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये.
काही दिवसांपूर्वी त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने जेतेपदाला गवसणी घातली होती.
आता तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. एका फॅनने चक्क लग्नाच्या पत्रिकेवर एमएस धोनीचा फोटो प्रिंट केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.
व्हायरल होत असलेला फोटो छत्तीसगढच्या रायगड जिल्ह्यातील असल्याचं म्हटलं जात आहे. या लग्न पत्रिकेच्या दोन्ही बाजूला एमएस धोनीचा फोटो असल्याचं दिसून येत आहे. यासह एमएस धोनीचा ७ नंबरचा फोटो देखील प्रिंट करण्यात आला आहे. हा फोटो प्रिंट करणाऱ्या फॅनचं नाव दीपक पटेल असं आहे.
दीपक पटेल हा एमएस धोनीला आपला आदर्श मानतो. याबाबत बोलताना तो म्हणाला की, 'एमएस धोनी मुळेच माझ्यात क्रिकेटची ओढ निर्माण झाली. ती ओढ अजूनही कायम आहे. मी माझ्या गावातील संघाचा कर्णधार आहे.
एमएस धोनी उत्तम कर्णधार आहे. मी त्याच्याकडून खूप काही गोष्टी शिकलो आहे. मी हे प्रसिध्दी मिळवण्यासाठी नाही केलं तर, मला मनापासून त्यांचा आदर आहे.' (Latest sports updates)
चेन्नईने पाचव्यांदा जेतेपदाला घातली गवसणी..
आयपीएल २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने गुजरात टायटन्स संघाला धूळ चारत जेतेपदाला गवसणी घातली होती.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला १५ षटकांमध्ये १७१ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. शेवटच्या २ चेंडूवर चेन्नईला विजयासाठी १० धावांची गरज होती.
त्यावेळी जडेजाने पाचव्या चेंडूवर षटकार आणि अंतिम चेंडूवर षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला. यासह चेन्नईने पाचव्यांदा जेतेपदाला गवसणी घातली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.