

आज टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. चाहत्यांमध्ये या सामन्याची प्रचंड उत्सुकता आहे. श्रीलंकेच्या मैदानावर हा सामना रंगणार असून पाकिस्तानच्या माजी गोलंदाजाने टीम इंडियाचा विस्फोटक ओपनर अभिषेक शर्मावर टीका केलीये.
आजच्या सामन्यात अभिषेककडून मोठी खेळी होण्याची अपेक्षा आहे. मात्र, सामन्यापूर्वी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरने अभिषेकवर टीका केली आहे. यावेळी त्याने अभिषेकला 'स्लॉगर' म्हटलंय.
मोहम्मद अमीर एका पाकिस्तानी शोमध्ये म्हणाला, "तो एक स्लॉगर (technique चा वापर करण्याऐवजी जोरदार फटकेबाजी करणारा) आहे. मी त्याला अशाच प्रकारे पाहतो. जो खेळाडू लाईन जज करू शकत नाही आणि बॉल डिफेंड करू शकत नाही. त्याला मी असचं म्हणेन. तो येतो आणि जोरात बॅट फिरवतो. मुख्य म्हणजे सध्यातरी त्याच्या बॅटला बॉल कनेक्ट होतोय"
आमिर पुढे म्हणाला, "पण ज्या दिवशी तो कठीण लाईन ओळखायला शिकेल आणि योग्यरित्या डिफेंड करायला शिकेल. त्यादिवशी माझं मत बदलेलं. तुम्ही छोट्या मैदानांवर आणि सपाट विकेट्सवर खेळत आहात. त्यामुळे तुमची अजून परीक्षा झालेली नाही. त्याला दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि इंग्लंडचा दौरा करू द्या. ज्याठिकाणी बॉल टर्न होतो. तीच त्याची खरी परीक्षा असेल. जर तो तिथे यशस्वी झाला तर मी त्याला एक चांगला फलंदाज म्हणणारा पहिली व्यक्ती असेन."
मोहम्मद आमीरच्या या विधानानंतर माजी पाकिस्तानी खेळाडू अहमद शहजादने अभिषेक शर्माला समर्थन दिलं. तो म्हणाला की, त्याला अभिषेक आवडतो आणि आमिर गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून विचार करतोय
त्यानंतर अमीर पुढे म्हणाला, "मला अजूनही विश्वास आहे की विराट कोहली या पिढीचा महान खेळाडू आहे. पण, माझ्या मते, अभिषेक शर्मा एक आक्रमक फलंदाज आहे. यानंतर " त्यानंतर अमीरने त्याला पुन्हा एकदा स्लॉगर म्हटलं आणि जे करायचंय ते करा, असं विधान केलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.