

मुंबई इंडियन्सने २४३ धावांचा मोठा स्कोअर उभारला
ट्रॅव्हिस हेड आणि क्लासेनच्या वादळी खेळीने SRHचा विजय
वानखेडेवर मुंबईचा धक्कादायक पराभव
आयपीएल २०२६ चा ४१ वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दोन्ही संघांनी मुक्तपणे धावा केल्या. अखेरीस हैदराबादने विजय मिळवला. हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेड आणि हेनरिक क्लासेन यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २४३ धावांचा डोंगर उभा केला.
रायन रिकल्टन आणि विल जॅक्स यांनी मुंबईसाठी शानदार खेळी केली. परंतु हैदराबादच्या शानदार खेळीनं हे आव्हान ६ विकेट राखत पार केलं. याप्रकारे हैदराबादनं मुंबईला त्यांच्याच घरच्या मैदानात पराभूत केलं. मुंबई इंडियन्सकडून रायन रिकल्टन आणि विल जॅक्स यांनी शानदार फलंदाजी केली. हैदराबादनेही आपल्या पाठलागात चांगली सुरुवात करत मुंबईला ६ गडी राखून पराभूत केले आणि दोन पॉईंट्स मिळवले.
२४४ धावांचे लक्ष्य गाठताना हैदराबादचे सलामीवीर अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी भक्कम सुरुवात केली. त्यांनी मिळून सहा षटकांत ९२ धावा जोडल्या. अभिषेक शर्माने २४ चेंडूंमध्ये ४५ धावा केल्या, तर ट्रॅव्हिस हेडने ३० चेंडूंमध्ये ७६ धावा केल्या. त्यानंतर हेनरिक क्लासेनने तुफान फलंदाजी केली. क्लासेनने ३० चेंडूंमध्ये ६५ धावा ठोकल्या, तर सलील अरोरानेही १० चेंडूंमध्ये नाबाद ३० धावा केल्या. हैदराबादने अवघ्या १८.४ षटकांत २४९/४ धावा करून सामना जिंकला.
रायन रिकेल्टनमुळे मुंबई इंडियन्सने मोठी धावसंख्या उभारली. मुंबई इंडियन्ससाठी डावाची सुरुवात करणाऱ्या विल जॅक्स आणि रायन रिकेल्टन यांनी संघाला भक्कम सुरुवात करून दिली. विल जॅक्सने २२ चेंडूंमध्ये ४६ धावा केल्या. मात्र रायन रिकल्टन शेवटपर्यंत फलंदाजी करत ५५ चेंडूंमध्ये धडाकेबाज १२३ धावा केल्या. त्याने ४४ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. आयपीएलच्या इतिहासात मुंबईसाठी सर्वात जलद शतक झळकावले.
रिकल्टन यांनी सनथ जयसूर्याचा विक्रम मोडला. त्याने २००८ मध्ये मुंबईकडून खेळताना सीएसकेविरुद्ध ४५ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. रिकल्टन नमनधिरने १७ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या. तर कर्णधार हार्दिक पांड्याही चांगल्या लयीत दिसत होता. त्याने १५ चेंडूंमध्ये ३१ धावा केल्या. अशाप्रकारे मुंबई इंडियन्सने २० षटकांत ५ गडी गमावून २४३ धावा केल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.