

मंगळवारच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने यंदाच्या सिझनमध्ये एकदाही पराभूत न झालेल्या पंजाब किंग्सला नमवले. या हाय स्कोअरिंग सामन्यात राजस्थानने पंजाबचा ६ विकेट्सने पराभव केला. मात्र, या सामन्यात एक अशी घटना घडली, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. यामध्ये राजस्थानचा कर्णधार रियान पराग सिगारेट ओढताना दिसतो आहे.
या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाब किंग्सने २० ओव्हर्समध्ये ४ विकेट्स गमावून २२२ रन्स केले. तर राजस्थान रॉयल्सला विजयासाठी २२३ रन्सचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने १९.२ ओव्हर्समध्ये ४ विकेट्स राखून २२८ रन्स केले आणि पंजाबचा पराभव केला.
राजस्थान रॉयल्सचा २४ वर्षीय कर्णधार रियान पराग पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान चर्चेत आला. रियान पराग राजस्थान रॉयल्सच्या ड्रेसिंग रूममध्ये व्हेप (ई-सिगारेट) ओढताना दिसला आणि या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. ही घटना राजस्थान रॉयल्सच्या डावाच्या १६ व्या ओव्हर दरम्यान घडली.
एका ब्रॉडकास्ट कॅमेऱ्याने रियान परागला व्हेपसारखे दिसणारे प्रोडक्ट वापरताना कैद केले. त्यानंतर परागचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे, ज्यामुळे अनेक चाहत्यांनी कारवाईची मागणी केली. रियान पराग १६ चेंडूंमध्ये २९ रन्स करून पव्हेलियनमध्ये परतल्यानंतर लगेचच ही घटना घडली.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याच्यावर कारवाई होणार की नाही, हा प्रश्न उपस्थित होतो आहे. व्हेपिंगविरोधात कोणताही सार्वजनिक नियम नसला तरी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्टेडियममधील खेळाडूंच्या वर्तनासाठी कठोर गाईडलाईन्स ठेवल्या आहेत.
आरोग्य आणि सुरक्षेच्या नियमांनुसार, ड्रेसिंग रूम किंवा डगआऊटमध्ये तंबाखू किंवा संबंधित उत्पादनांच्या वापरास मनाई आहे, ज्यामुळे रियान परागवर आता कारवाई होण्याची शक्यता आहे.
संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात गेल्यानंतर रियान पराग २०२६ च्या सिझनमध्ये राजस्थान रॉयल्सच्या टीमचे नेतृत्व करतो आहे. रियान परागला आपल्या फलंदाजीतील सातत्य टिकवून ठेवण्यासाठी आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. या सामन्यापूर्वी, त्याने सात डावांमध्ये केवळ ८१ रन्स केले होते, ज्यामुळे चाहते आणि माजी खेळाडूंकडून त्याच्यावर टीका झाली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.