Mary Kom Divorce : पतीसोबत दोन वर्षांपूर्वीच घटस्फोट; सहकाऱ्याच्या पतीसोबत नात्यावर दिलं स्पष्टीकरण

Mary Kom Divorce News : एमसी मेरी कोमने दोन वर्षांपूर्वीच घटस्फोट घेतला. याची माहिती तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन दिली. काही दिवसांपासून मेरी आणि तिचा पती वेगळे राहत होते. त्यामुळे तिच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले होते.
Marry Kom Divorce News
Marry Kom Divorce NewsSaam Tv
Published On

Marry Kom : भारताची सर्वात यशस्वी बॉक्सर आणि ऑलिम्पिक पदक विजेती एमसी मेरी कोमचे नाव देशभरात मोठ्या आदराने घेतले जाते. अलीकडच्या काळात मेरी कोम पुन्हा एकदा चर्चेत होती. पण यावेळेस तिचे खासगी आयुष्य चर्चेचा विषय बनले होते. मेरी कोम आणि तिचा पती करुंग ओन्खोलर कोम (ओनलर) २०२२ मध्ये विभक्त झाल्याची माहिती समोर आली आहे. दोघांमध्ये दीर्घकाळ मतभेद होते. त्यातूनच दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला असा खुलासा मेरी कोमने केला.

मेरी कोमने तिच्या वकिलांच्या मार्फत प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले, 'मी आणि माझा पती करुंग ओन्खोलर वेगळे झालो आहोत. २० डिसेंबर २०२३ रोजी आमचा कायदेशीररित्या घटस्फोट झाला आहे.' मेरी आणि तिचा सहकारी हितेश चौधरी यांच्यातील संबंधांबाबत अफवा आणि ऑनलाइन चर्चा जोर धरत होत्या. याच दरम्यान मेरी कोमने घटस्फोटाची माहिती दिली आहे.

Marry Kom Divorce News
कुलदीप यादवनं रिंकू सिंहला दोनदा कानफटवलं; KKR नं शेअर केला दोघांचा नवा व्हिडिओ

निवेदनाद्वारे सुरु असलेल्या चर्चांवर मेरी कोमने स्पष्टीकरण दिले. सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चा खोट्या असल्याचेही तिने सांगितले. कोणत्याही प्रकारच्या प्रेमसंबंधात असल्याचे तिने नाकारले. मी आणि ओनलर परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचेही मेरी कोमने सांगितले. आम्ही दोघे जवळपास दोन वर्षांपासून वेगळे राहत आहोत असेही मेरीने निवेदनात म्हटले.

Marry Kom Divorce News
MS Dhoni : पुढचा सामना खेळेन की नाही हे मलाही माहीत नाही, असं एमएस धोनी का म्हणाला? पाहा व्हिडीओ

'एम.सी. मेरी कोम आणि करुंग ओन्खोलर (ओनलर) कोम यांच्यात वैवाहिक संबंध उरलेले नाहीत. दोघांनीही २० डिसेंबर २०२३ रोजी दोन्ही कुटुंबाच्या आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत KOM प्रथेनुसार परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. माझ्या क्लायंटचा (मेरी कोम) हितेश चौधरी किंवा इतर कोणासोबतही कोणत्याही प्रकारचा प्रेमसंबंध नाही. या संदर्भातील सर्व गोष्टी खोट्या, चुकीच्या आहेत. या अफवा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने पसरवू नये, असे मेरी कोमच्या वकिलांने प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये नमूद केलेले आहे.

Marry Kom Divorce News
CSK Vs PBKS : पंजाब किंग्सला मोठा धक्का! स्टार खेळाडू IPL 2025 मधून बाहेर, टॉसच्या वेळी अय्यरने दिली अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com