

Why Abhishek Sharma was hospitalised during T20 World Cup : टी२० विश्वचषक सुरू असतानाच भारतीय संघासाठी सर्वात वाईट बातमी आली आहे. विस्फोटक सलामी फलंदाज अभिषेक शर्मा आजारी पडलाय. पोटातील इंफोक्शनमुळे अभिषेक शर्माला रात्री अचानक रूग्णालयात अॅडमीट (Abhishek Sharma Hospitalised) कऱण्यात आले आहे. त्यामुळे गुरूवारी होणाऱ्या सामन्यात अभिषेक शर्मा खेळण्याची शक्यता धुसूरच आहे. १५ फेब्रुवारी राजी पाकिस्तानविरोधात हायव्होल्टेज सामना होणार आहे, त्याआधी अभिषेक शर्मा तंदुरूस्त होणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Abhishek Sharma latest health update)
दिल्लीमध्ये १२ फेब्रुवारी रोजी भारत आणि नामेबिया यांच्यामध्ये लढत होणार आहे. पाकिस्तानविरोधातील हायव्होल्टेज सामन्याआधी भारतीय टीम संतुलनासाठी हा सामना महत्त्वाचा मानला जातोय. या सामन्यात जसप्रीत बुमराहचे कमबॅक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावऱण होते. पण त्यातच आता अभिषेक शर्मा आजारी पडल्याने टीम इंडियाचे आणि चाहत्यांचे टेन्शन वाढलेय. दिल्लीमधील अरूण जेटली स्टेडियमवर भारत टी२० विश्वचषकातील दुसरा सामना खेळत आहे. पण या सामन्यात अभिषेक शर्माच्या खेळण्यावर शंका आहे.
भारताचा धडाकेबाज सलामीवीर अभिषेक शर्मा सध्या पोटाच्या विकाराने त्रस्त आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने चाहत्यांची धाकधूक वाढली होती. सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोएशे यांनी सांगितलं की, अभिषेकला पोटाचा त्रास आहे, पण तो लवकरच फिट होईल. काही दिवसांत तो मैदानावर खेळताना दिसेल अशी आशा आहे. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या सामन्यात तो खेळणार की नाही, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
टीम इंडियाचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराह आता पूर्णपणे फिट झाला आहे. सरावादरम्यान त्याने जबरदस्त वेगाने गोलंदाजी केली. त्याने कर्णधार सूर्यकुमार यादवला आपल्या वेगवान चेंडूवर चक्क बोल्ड केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. १० दिवसांच्या विश्रांतीनंतर बुमराह पुन्हा आपल्या जुन्या लयीत परतल्याने भारतीय गोटात आनंदाचं वातावरण आहे. दुखापतीमुळे चर्चेत असलेला वॉशिंग्टन सुंदर संघात परतला असून त्याने सरावही सुरू केला आहे. सरावादरम्यान तो मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्यासोबत बराच वेळ चर्चा करताना दिसला. त्याने तिलक वर्माला गोलंदाजी करून आपली तयारी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.