Ms Dhoni
Ms DhoniSaam Tv

Mahendra Singh Dhoni: आर्रर्रर्र... महेंद्रसिंग धोनीलाही सोडलं नाही, क्रिकेटपटूनंच फसवल्यानं कोर्टात जावं लागलं, काय आहे प्रकरण?

Mahendra Singh Dhoni News: महेंद्रसिंग धोनीशी संबंधित एक मोठं वृत्त हाती आलं आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या फसवणुकीविरोधात महेंद्रसिंग धोनीने रांचीतील कोर्टात तक्रार दाखल केली आहे.
Published on

Mahendra Singh Dhoni Latest News:

महेंद्रसिंग धोनीशी संबंधित एक मोठं वृत्त हाती आलं आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या फसवणुकीविरोधात महेंद्रसिंग धोनीने रांचीतील कोर्टात तक्रार दाखल केली आहे. धोनीने कोर्टात मिहिर दिवाकर आणि सौम्या विश्वासच्या विरोधात कोर्टात तक्रार दाखल केली आहे, सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

महेंद्रसिंग धोनीने माजी खेळाडू मिहिर दिवाकर आणि सौम्या विश्वास या दोघांच्या स्पोर्ट्स मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीच्या विरोधात फसवणुकीचा आरोप करत कोर्टात तक्रार दाखल केली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ms Dhoni
South Africa Cricket: कसोटी क्रिकेटचा अंत निश्चित? द. आफ्रिका क्रिकेट बोर्डाच्या या धक्कादायक निर्णयाने क्रिकेटविश्वात खळबळ

काय आहे प्रकरण?

महेंद्र सिंग धोनी आणि मिहिर दिवाकर यांच्यात नवीन अॅकेडमी सुरु करण्यासाठी करार झाला होता. महेंद्रसिंग धोनी आणि मिहिर दिवाकर यांच्यात २०१७ मध्ये करार झाला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, करार झाल्यानंतर मिहिरने अटी पूर्ण केल्या नाही. यावरून महेंद्रसिंग धोनीने मिहिर दिवाकरच्या विरोधात कोर्टात केस दाखल केली आहे.

Ms Dhoni
AUS vs PAK: फिल्डिंग करताना कॅपमुळे बाऊंड्री थांबली! तरीही पेनल्टी का नाही दिली? वाचा कारण

मिळालेल्या माहितीनुसार, मिहिरने आरका स्पॉर्ट्स फ्रेंचाइजीची फी आणि नफा शेअर केला नाही. यावरून धोनीने वारंवार कायदेशीर नोटीस पाठवली होती. मात्र, मिहिरकडून काहीच उत्तर आलं नाही. करारानुसार, धोनीला १७ कोटींचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे.

दरम्यान, महेंद्र आणि मिहिर दिवाकर यांच्यात चांगली मैत्री होती. दोघांनी क्रिकेट अकॅडमी सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या काही महिन्यांपासून दोघांच्या मैत्रीत दरार आल्याची माहिती आली होती. त्यानंतर आता महेंद्रसिंग धोनीने मिहिरच्या विरोधात कोर्टात तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com