Lionel Messi: अबब! लिओनेल मेस्सीसोबत १ फोटो काढण्यासाठी मोजावे लागणार लाखो रुपये; आकडा वाचून पायाखालची जमीन सरकेल
लिओनेल मेस्सी ३ दिवसांच्या भारत दौऱ्यावर
४ शहरांना देणार भेट
लिओनेल मेस्सीसोबत १ फोटो काढण्यासाठी १० लाख रुपये
फुटबॉलचा GOAT म्हणून ओळखला जाणारा लिओनेल मेस्सी भारतात आला आहे. तब्बल १४ वर्षानंतर तो भारतात परतला आहे. त्याच्या GOAT India Tour मुळे भारतातील चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. मेस्सी भारतात येणार असल्याने त्याच्यासोबत भेट होणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, त्याच्या दौऱ्यासंबंधित एक महत्त्वाची माहिती समोर आली त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी पसरली. सर्व चाहत्यांना लिओनेल मेस्सीला भेटता येणार नाही. यासाठी शुल्क चार्ज करण्यात आले आहेत.
फक्त १०० चाहत्यांना भेटण्याची संधी
लिओनेल मेस्सी भारत दौऱ्यावर असताना चार शहरांना भेट देणार आहे. आज सकाळी १०.३०वाजता तो कोलकत्तामधील साल्ट लेक स्टेडियममध्ये तिथे त्याचा पहिला कार्यक्रम पार पडला. यानंतर हैदराबादमध्ये Meet and Greet आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये फक्त १०० चाहत्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
लिओनेल मेस्सीसोबत फोटो काढण्यासाठी १० लाख
लिओनेल मेस्सी १०० चाहत्यांना जरी भेटणार असला तरीही त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागणार आहे. १ फोटो काढण्यासाठी तब्बल ९.९५ लाख रुपये मोजावे लागणार आहे. हा कार्यक्रम हैदराबादमधील फालकनुमा पॅलेसमध्ये होणार आहे. यामध्ये District App द्वारे तुम्हाला बुकिंग करता येणार आहे.
नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
लिओनेल मेस्सीसोबत फोटो काढण्यासाठी १० लाख रुपये मोजावे लागणार असल्याचे ऐकून सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. मेस्सीसोबत हात मिळवण्यासाठी १० लाख रुपये? इतक्या पैशात तर मी अर्जेंटिनाला जाऊन फोटो काढून परत येऊ शकतो, अशा कमेंट्स आल्या आहेत. तर अनेकांनी मोफत फोटो काढण्याचाही ऑप्शन सुचवला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

