Manasvi Choudhary
मराठीतील अनेक मालिकांमध्ये अभिनय सादर करून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे मीरा जगन्नाथ.
मीरा जगन्नाथने तिच्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मीराचे नुकतेच हॉट फोटो व्हायरल झाले आहेत.
या फोटोशूटसाठी मीराने ऑफशोल्डर वनपीस घातला आहे. तिचा हा लूक काळजाचा ठोका चुकवत आहे.
मीराने या फोटोशूटमध्ये मादक पोज दिल्या आहेत. सध्या नेटकऱ्यांचे लक्ष मीराच्या फोटोंनी वेधले आहे.
मीराच्या या फोटोशूटवर अभिनेता पुष्कर जोगने देखील प्रतिक्रिया दिली आहे.
मराठी सिनेसृष्टीतील स्टायलिश अभिनेत्रीपैकी एक म्हणजे मीरा जगन्नाथचं नाव घेतलं जातं.
अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारत मीराने स्वत:ची अनोखी ओळख निर्माण केली आहे.
मीरा जगन्नाथने बिग बॉस मराठीमध्ये देखील सहभाग घेतला होता.