

लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली.
मेस्सीने इंस्टाग्रामवरील भावनिक पोस्टद्वारे आपल्या निर्णयाची घोषणा केली.
स्पेनविरुद्धच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर हा निर्णय घेतला.
लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलला कायमचा रामराम ठोकलाय. हो, अगदी बरोबर तुम्ही जे वाचताय ते अगदी बरोबर दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने इस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट करत आपल्या निवृत्तीची घोषणा केलीय. फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनविरुद्ध झालेला पराभव आणि त्यानंतर वडिलांच्या निधनामुळे मेस्सीला मानसिक धक्का बसला होता. याच कारणाने मेस्सीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर अत्यंत भावनिक पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केलीय.
आपल्या पोस्टमध्ये मेस्सीने लिहिले की, स्पेनविरुद्धचा अंतिम सामना हरल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच त्याने हा मोठा निर्णय घेतला होता. मात्र, वडिलांच्या निधनानंतर त्याने निवृत्ती घेण्याचा निश्चय अधिकच दृढ केला. मेस्सीने आपल्या पोस्टमध्ये निवृत्तीबाबत निर्णय घेणे अत्यंत वेदनादायी होतं, असं म्हटलंय.
मेस्सीनं फुटबॉल विश्वात मोठं नाव कमावलं आहे. त्यानं २०२२ च्या फीफा वर्ल्डकपमध्ये देशाला जेतेपद मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावली. त्याचसोबत सलग दोन कोपा अमेरिकाचे दोन जेतेपदही जिंकून दिले आहेत. अभूतपूर्व अशा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्यानं अर्जेंटिनाकडून १८५ हून अधिक सामने खेळले आहेत. सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून फुटबॉलच्या इतिहासातील महान खेळाडूंमध्ये त्याची नोंद झाली. विशेष बाब म्हणजे, क्लबकडून तो खेळणार असून त्याच्या चाहत्यांना 'गोलपर्वणी'चा अनुभव देणार आहे.
आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर करताना तो भावुक झाला. बराच विचार केल्यानंतर मी राष्ट्रीय संघातून संन्यास घेत आहे, असं सांगू इच्छितो. हा निर्णय खूपच कठीण होता. मला खूपच दुःख होत आहे. पण हीच योग्य वेळ होती, असं मला वाटतंय. मी माझ्याकडून सर्वोत्तम दिलं, असं मी शपथ घेऊन सांगतो, असं तो म्हणाला.
मी या जर्सीसाठी नेहमीच संघर्ष केला. फुटबॉलच्या माध्यमातून तुम्हाला आनंद देता येईल, तुम्हाला अर्जेंटिनाचा नागरिक असल्याचा अभिमान वाटावा यासाठी माझ्यापरीने सर्वकाही केलं. हा एक असा अध्याय आहे की सध्याच्या घडीला मला खूपच दुःख होत आहे. राष्ट्रीय संघाचा भाग होणे मला नेहमीच आवडायचे. मी माझं सर्वकाही दिलं. आता माझ्याकडे देण्यासारखं काही नाही. अनेक प्रतिभावान युवा खेळाडू उदयास येत आहेत, असंही त्यानं पोस्टमध्ये नमूद केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.