

भारताचा 'सुपरस्टार' भालाफेकपटू नीरज चोप्रा दुखापतीमुळं यावर्षीच्या उर्वरित स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकत नाही. यापुढील काळात होणाऱ्या उर्वरित सर्व स्पर्धांमधून त्यानं माघार घेतली आहे. तसेच पुढील महिन्यात होणाऱ्या डायमंड लीग फायनल्स आणि एशियन गेम्समध्येही तो सहभागी होऊ शकणार नाही. एशियन गेम्समध्ये त्याच्याकडून पदकाची अपेक्षा केली जात होती. पण आता दुखापतीमुळं तो बाहेर झाल्यानं भारतीय चमू आणि क्रीडा चाहत्यांना हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
नीरज चोप्रा यानं यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. दुखापतीमुळं मला आणि माझ्या टीमला या सीझनमधील उर्वरित स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार नाही. दुर्दैवाने ट्रेनिंगवेळी पायाला दुखापत झाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर या मोसमातील उर्वरित स्पर्धांमध्ये सहभागी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला, असं नीरज म्हणाला.
नीरजने चांगल्या कामगिरीच्या जोरावर डायमंड लीगच्या फायनलमध्ये स्थान निश्चित केलं होतं. झुरिचमध्ये झालेल्या सामन्यात खेळला नाही तरी तो फायनलच्या शर्यतीत पुढे होता. फायनलमध्ये एन्ट्री केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच त्याने उर्वरित सर्व स्पर्धांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
डायमंड लीगमध्ये १२ गुण
यावर्षी नीरजने डायमंड लीगमध्ये खेळताना १२ गुणांची कमाई केली होती. स्वीत्झर्लंडच्या लुसानेमध्ये झालेल्या सामन्यात त्याने या मोसमातील विक्रमी ८८.०५ मीटर लांबीचा थ्रो फेकला होता. अवघ्या ९ सेंटिमीटर अंतराच्या फरकाने त्याने पहिलं स्थान गमावलं होतं. त्याआधी दोहा डायमंड लीग, तर कॉमनवेल्थ गेम्समध्ये तो सहभागी झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.