Neeraj Chopra: नीरज चोप्रा झाला लेफ्टिनंट कर्नल; राजनाथ सिंह अन् सेनाप्रमुखांकडून 'गोल्डन बॉय'चा सन्मान

Neeraj Chopra Honorary Rank Of Lieutenant Colonel : ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांना भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी 'गोल्डन बॉय'चा सन्मान केला . दिल्ली येथे झालेल्या एका समारंभात हा सन्मान सोहळा पार पडला.

भारताच्या गोल्डन बॉयला बुधवारी भारतीय लष्करातील मानद लेफ्टिनंट कर्नल पद देण्यात आले आहे. दिल्ली येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सेनाप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत नीरज चोप्राला लष्करातील नवी रँक देऊन सन्मानित करण्यात आले. जगातील मानाची स्पर्धा असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सलग दोन हंगामात भारताला पदक मिळवून देणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राच्या शिरेपेचात एक मानाचा तुरा रोवला गेलाय.

‘द गॅझेट ऑफ इंडिया’ (सरकारी माहिती पत्र) नुसार, नीरज चोप्राची ही नियुक्ती १६ एप्रिल पासून प्रभावी झाली. २६ ऑगस्ट २०१६ रोजी ज्युनियर कमिशन्ड ऑफिसरच्या रुपात नायब सुभेदार रँकसह त्याचा लष्करातील प्रवास सुरु झाला होता. २०२० मध्ये पॅरिस येथील ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केल्यावर २०२१ मध्ये नीरज चोप्रा सुभेदार पदावर बढती देण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com