IPL 2025: KKR vs RCB सामना रद्द होणार? कोलकात्यातून समोर आली लेटेस्ट अपडेट

KKR vs RCB, Kolkata Weather Update: आयपीएल २०२५ स्पर्धेतील सलामीचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांंमध्ये रंगणार आहे.
IPL 2025: KKR vs RCB सामना रद्द होणार? कोलकात्यातून समोर आली लेटेस्ट अपडेट
kkr vs rcbtwitter
Published On

आयपीएल २०२५ स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या संघातील सामन्याने या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांमध्ये हाय व्हॉल्टेज सामना पाहायला मिळेल यात काहीच शंका नाही.

मात्र सामन्यापूर्वीच फॅन्सला निराश करणारी बातमी समोर आली. या सामन्यावर पावसाचं सावट आहे, त्यामुळे हा सामना रद्द होऊ शकतो, अशी चर्चा सुरु असताना आता कोलकात्यातील हवामानाची लेटेल्स अपडेट समोर आली आहे.

IPL 2025: KKR vs RCB सामना रद्द होणार? कोलकात्यातून समोर आली लेटेस्ट अपडेट
IND vs NZ: टीम इंडिया तर मालामाल पण न्यूझीलंडवरही पैशांचा पाऊस; पाहा दोन्ही संघांना किती मिळाली प्राईज मनी

आयपीएल २०२५ स्पर्धेतील सलाामीचा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी ओपनिंग सेरेमनीचा रंगारंग कार्यक्रम होणार आहे. मात्र सामन्याच्या एक दिवासापूर्वी कोलकात्यात जोरदार पाऊस झाला, खेळपट्टीवर कव्हर्स आणि स्टँड्समध्ये पाणीच पाणी दिसून आलं.

त्यामुळे सामना रद्द होतो की काय? अशी चर्चा रंगली होती. मात्र दुपारच्या वेळी कोलकात्यात ऊन पडलं असून पाऊस पडण्याचे काहीच संकेत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सामना होणार आणि क्रिकेट चाहत्यांचं मनोरंजनही होणार यात काहीच शंका नाही.

IPL 2025: KKR vs RCB सामना रद्द होणार? कोलकात्यातून समोर आली लेटेस्ट अपडेट
IPL 2025: आयपीएलच्या तिकीटांची विक्री सुरु, काय आहे किंमत? कुठून विकत घेऊ शकता जाणून घ्या प्रोसेस

कोलकाता - बंगळुरु भिडणार

आयपीएल २०२४ स्पर्धेत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळताना कोलकाता नाईट रायडर्सने जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. त्यामुळे कोलकात्याला पहिला सामना खेळण्याचा मान मिळाला आहे.

हा सामना कोलकात्याच्या होम ग्राऊंडवर म्हणजे, ईडन गार्डन्सच्या मैदानावर होणार आहे. कोलकात्यासमोर रॉयल चॅलेजंर्स बंगळुरु संघाला हरवण्याचं मोठं आव्हान असणार आहे. दोन्ही संघांमध्ये एकापेक्षा एक स्टार खेळाडू आहेत. त्यामुळे क्रिकेट फॅन्सला हाय व्हॉल्टेज सामना पाहायला मिळेल.

IPL 2025: KKR vs RCB सामना रद्द होणार? कोलकात्यातून समोर आली लेटेस्ट अपडेट
IPL 2025: क्रिकटचे हे धुरंदर आयपीएल २०२५ मधून बाहेर, 'या' खेळाडूंनी घेतली जागा

सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये एकापेक्षा एक स्टार खेळाडू आहेत. हा सामना पावसामुळे रद्द होणार अशी बातमी समोर येताच, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडायला सुरुवात झाली.

कोलकात्याचे फॅन्स, आरसीबीच्या फॅन्सला डिवचण्यासाठी एक पॉईंट फुकट मिळणार, अशी पोस्ट शेअर करताना दिसून येत आहेत. मात्र कोलकात्यातील हवामान पाहता, सामना होणार आणि सामन्याचा निकालही लागणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com