Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Sonam Maskar Shooting: कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज सोनम उत्तम मस्कर हिने आशियाई नेमबाजी स्पर्धेत सांघिक रौप्यपदक पटकावलं. एलावेनिल वलारिवन आणि विदर्शा के. विनोद यांच्यासोबत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत सोनमने अंतिम फेरीत महत्त्वाची कामगिरी केली.
Sonam Maskar
Sonam Maskarsaam tv
Published On

कोल्हापूरच्या आंतरराष्ट्रीय नेमबाज सोनम उत्तम मस्कर हिने आशियाई नेमबाजी स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. एलावेनिल वलारिवन, सोनम मस्कर आणि विदर्शा के. विनोद या तिघांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने सांघिक रौप्यपदक पटकावलं. अंतिम फेरीत स्थान मिळवत सोनमने भारताच्या पदकाच्या शर्यतीत महत्त्वाची भूमिका बजावली. तिच्या या कामगिरीमुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

आंतरराष्ट्रीय नेमबाजीच्या मैदानात कोल्हापूरच्या सोनम उत्तम मस्करने पुन्हा एकदा आपली छाप पाडली आहे. एलावेनिल वलारिवन, सोनम मस्कर आणि विदर्शा के. विनोद या त्रिकुटाने भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. या संघाने सांघिक रौप्यपदकाला गवसणी घातली. अंतिम फेरीत स्थान मिळवत सोनमने भारताच्या पदकाच्या शर्यतीत महत्त्वाची भूमिका बजावली. तिच्या या कामगिरीमुळे भारतीय संघाच्या पदकविजयात मोलाची भर पडली.

Sonam Maskar
WPL 2024: अभिमानास्पद! लिलावात कोट्यधीश होणारी Vrinda Dinesh आई-वडिलांसाठी करणार ‘ही’ गोष्ट; वाचून कौतुकच कराल

आंतरराष्ट्रीय नेमबाज आणि शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या राधिका बराले-हवालदार तसंच राष्ट्रीय प्रशिक्षक रोहित हवालदार यांच्या मार्गदर्शनाखाली सोनमने नेमबाजीचे धडे गिरवले. या काळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत सोनमने अनेक पदकांची कमाई केली.

ज्युनिअर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील पदकांसोबतच कायरोमध्ये झालेल्या सीनियर वर्ल्ड कपमधील रौप्यपदक हे तिच्या कारकिर्दीतील महत्त्वाचं यश ठरलंय. सातत्यपूर्ण सराव, कठोर मेहनत आणि दर्जेदार प्रशिक्षणाच्या जोरावर सोनमने आंतरराष्ट्रीय नेमबाजीच्या क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

सध्या सोनम भारतीय क्रीडा प्राधिकरण अर्थात साईच्या कार्यक्रमांतर्गत नवी दिल्ली येथे उच्चस्तरीय प्रशिक्षण घेत आहे. भारतीय राष्ट्रीय प्रशिक्षक थॉमस यांच्या मार्गदर्शनाखाली तिचा सराव सुरू आहे. आशियाई स्तरावरील या सांघिक रौप्यपदकामुळे सोनमच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. तिच्या या कामगिरीमुळे कोल्हापूरच्या नेमबाजी क्षेत्राच्या लौकिकातही भर पडली आहे.

Sonam Maskar
टीम इंडियाला मिळणार नवा 'हेड कोच'; इंग्लंड मालिकेनंतर संघात होणार मोठा बदल, धक्कादायक कारण आलं समोर

लेकीच्या स्वप्नासाठी वडिलांनी विकली जमीन

सोनम मस्करच्या यशामागे तिच्या कुटुंबाच्या त्यागाची मोठी कहाणी आहे. गारगोटीची असलेल्या सोनमने 2018 मध्ये मुंबईतील तोलानी कॉमर्स कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना छंद म्हणून नेमबाजीला सुरुवात केली. याआधी ती बुद्धिबळ खेळत होती. कोरोना काळात कुटुंबावर आर्थिक संकट आलं. त्याचवेळी नेमबाजीसाठी महागडी रायफल आणि आवश्यक साहित्य घेणं गरजेचं होतं. मुलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडील उत्तम मारुती मस्कर यांनी जमीन आणि मालमत्ता विकण्याचा धाडसी निर्णय घेतला.

Sonam Maskar
टीम इंडियाची चिंता वाढली! वेस्ट इंडिज संघात 'या' धडाकेबाज खेळाडूची अचानक वापसी; T20 आणि ODI मालिकेसाठी संघ जाहीर

वडिलांच्या त्यागाला सार्थ ठरवण्यासाठी सोनमनेही कठोर मेहनत घेतली. 2021 पासून तिने कोल्हापुरातील ‘वेध शूटिंग अकॅडमी’मध्ये राधिका बराले-हवालदार आणि रोहित हवालदार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला. पुढे मे 2023 पासून ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचं सहकार्य तिला मिळालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com