टीम इंडियाची चिंता वाढली! वेस्ट इंडिज संघात 'या' धडाकेबाज खेळाडूची अचानक वापसी; T20 आणि ODI मालिकेसाठी संघ जाहीर

India vs West Indies squad : भारताविरुद्धच्या आगामी वनडे आणि टी-२० मालिकेसाठी वेस्ट इंडिजने संघ जाहीर केला आहे. शिमरॉन हेटमायरचे टी-२० संघात पुनरागमन झाले असून शाय होपकडे दोन्ही संघांचे नेतृत्व आहे.
India vs West Indies squad
India vs West Indies squad
Published On

भारतात होणाऱ्या टी-२० आणि एकदिवसीय (ODI) मालिकेसाठी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाकडून (CWI) संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतासारख्या तगड्या संघाविरुद्ध दोन हात करण्यासाठी वेस्ट इंडिजने आपल्या संघात महत्त्वाचे बदल केले आहेत. धडाकेबाज आणि मॅचविनर शिमरॉन हेटमायरचे संघात पुनरागमन झाले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या आयसीसी टी-२० विश्वचषक संघाचा सदस्य असलेल्या क्वेंटिन सॅम्पसनचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

शाय होपच्या (Shai Hope) नेतृत्वाखालील या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा उत्तम मेळ घालण्यात आला आहे. संघात झालेल्या या मोठ्या फेरबदलांमुळे आगामी मालिका अत्यंत रोमांचक होणार आहे. शिमरॉन हेटमायरच्या वापसीमुळे भारतीय संघाचीही चिंता काही प्रमाणात वाढली आहे. अष्टपैलू जेसन होल्डरला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

India vs West Indies squad
Coastal Road Accident : कोस्टल रोडवर भरधाव बीएमडब्ल्यू कारचा अपघात, ३ तरुणांचा मृत्यू, १ गंभीर

एकदिवसीय मालिका २७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर टी-२० मालिका होणार आहे. या दोन्ही फॉरमॅटमध्ये शाय होप याच्याकडे वेस्ट इंडिज संघाचे कर्णधारपद आहे. वेस्ट इंडिजने आपल्या एकदिवसीय संघात फारसे बदल केलेले नाहीत, पण शिमरॉन हेटमायर याचं संघात पुनरागमन झाले आहे. त्याशिवाय हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे जॉन कॅम्पबेल न्यूझीलंडविरुद्धचे शेवटचे दोन एकदिवसीय सामने खेळू शकला नाही, पण आता तो संघात परतत आहे.

India vs West Indies squad
Ganpati Visarjan : बाप्पाला निरोप देताना भयंकर घडलं! पाण्याचा अंदाज चुकल्याने बाप-लेक बुडाले

T20 आणि ODI मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाची घोषणा

एकदिवसीय संघ : शाय होप (कर्णधार), ज्वेल अँड्र्यू, जॉन कॅम्पबेल, कीसी कार्टी, रॉस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, जस्टिन ग्रीव्ह्स, अमीर जांगू, अल्झारी जोसेफ, शमर जोसेफ, विटेल लॉज, गुडाकेश मोती, कीमो पॉल, शेर्फेन रदरफोर्ड, जेडन सील्स.

T20I संघ: शाय होप (कर्णधार), ज्वेल अँड्र्यू, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, शिमरॉन हेटमायर, अकील हुसेन, शमर जोसेफ, गुडाकेश मोती, कीमो पॉल, कामिल पूरन, रोवमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, क्वेंटिन सॅम्पसन, शॅमार शेमरिंग, रोमा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com