KKR vs SRH, IPL 2024 Winner: गंभीरचा पायगुण KKR साठी ठरला लकी! हैदराबादला नमवत तिसऱ्यांदा कोरलं IPL ट्रॉफीवर नाव

KKR vs SRH, IPL 2024 Highlights: आयपीएल २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये पार पडला.
KKR vs SRH, IPL 2024 Winner: गंभीरचा पायगुण KKR साठी ठरला लकी! हैदराबादला नमवत तिसऱ्यांदा कोरलं IPL ट्रॉफीवर नाव
Kolkata knight riderssaam tv

कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata knight riders)संघ आयपीएल २०२४ (IPL 2024) स्पर्धेचा विजेता संघ ठरला आहे. या विजयासह कोलकाता नाईट रायडर्स संघाने तिसऱ्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला ११४ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने सनरायझर्स हैदराबादचा एकतर्फी पराभव केला आहे.

हैदराबादने केल्या ११३ धावा

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. कारण हैदराबादचा संपूर्ण डाव अवघ्या ११३ धावांवर आटोपला. सनरायझर्स हैदराबादकडून प्रथम फलंदाजी करताना कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक २४ धावांची खेळी केली. तर एडेन मार्करमने २० धावा केल्या. तर अभिषेक शर्मा २, ट्रेविस हेड ०, राहुल त्रिपाठी ९, नितीश कुमार रेड्डी अवघ्या १३ धावा करत माघारी परतला. कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या शानदार गोलंदाजीमुळे हैदराबादचा पहिला डाव अवघ्या ११३ धावांवर आटोपला. (SRH vs KKR IPL 2024 Final)

KKR vs SRH, IPL 2024 Winner: गंभीरचा पायगुण KKR साठी ठरला लकी! हैदराबादला नमवत तिसऱ्यांदा कोरलं IPL ट्रॉफीवर नाव
KKR vs SRH, IPL 2024 Final Toss: फायनलमध्ये हैदराबादने जिंकला टॉस; KKR ला गोलंदाजीचं आमंत्रण; पाहा प्लेइंग ११

कोलकाता नाईट रायडर्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी ११४ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना. सुनील नरेन ६ धावा करत माघारी परतला. त्यानंतर रहमानुल्लाह गुरबाज आणि वेंकटेश अय्यर या दोघांनी मिळून कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजय मिळवून दिला.

आयपीएल स्पर्धेतील फायनलच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या

सनरायझर्स हैदराबाद या संघाने संपूर्ण हंगामात वादळी सुरुवात केली. या हंगामात त्यांनी आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. दरम्यान याच हंगामात त्यांच्या नावे नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. फायनलमध्ये सर्वात कमी धावा करण्याचा रेकॉर्ड हा सनरायझर्स हैदराबादच्या नावावर नोंदवला गेला आहे. यापूर्वी हा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर होता. मुंबई इंडियन्सने. चेन्नईविरुद्ध झालेल्या फायनलमध्ये मुंबईने ९ गडी बाद १२५ धावा केल्या होत्या.

KKR vs SRH, IPL 2024 Winner: गंभीरचा पायगुण KKR साठी ठरला लकी! हैदराबादला नमवत तिसऱ्यांदा कोरलं IPL ट्रॉफीवर नाव
KKR vs SRH: दुसऱ्यांदा IPL ची ट्रॉफी जिंकण्यासाठी हैदराबादचा संघ उतरणार मैदानात; कसा राहिलाय आतापर्यंतचा प्रवास?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com