

अखेर विमेंस वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री केली आहे. या सामन्याची खरी नायिका जेमिमा रॉड्रिग्ज ठरलीये. जेमिमाने 127 रन्सची नाबाद खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर जेमिमाला अश्रू अनावर झाले होते.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३३९ रन्सचं भारताला आव्हान दिलं होतं. यावेळी टीम इंडियासाठी हे खूप कठीण आव्हान होतं. मात्र टीम इंडियाच्या मुलींनी हे आव्हान पूर्ण करत इतिहास रचला. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा यांना रडू कोसळलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
भारताने महिला वर्ल्डकप 2025 च्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियावर मोठा विजय मिळवत आठ वर्षांपासून सुरू असलेला त्यांचा विजयी रथ रोखला आहे. ऑस्ट्रेलियाची महिला टीम यापूर्वी शेवटची वेळ 2017 मध्ये पराभूत झाली होती आणि तेव्हाही त्यांना हरवणारी टीम इंडियाच होती.
या विजयासह आता निश्चित झालंय की, २ नोव्हेंबर २०२५ रोजी नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर अंतिम सामन्यात जगाला नवा महिला विश्वविजेता मिळणार आहे. कारण भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही टीम्सने आजवर एकदाही वर्ल्डकप जिंकलेला नाही.
भारतीय महिला टीमने तिसऱ्यांदा वनडे वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. याआधी 2005 आणि 2017 मध्ये भारत उपविजेता ठरला होता. यावेळी मात्र संघाचा निर्धार पहिल्यांदाच विश्वविजेतेपद पटकावण्याचा आहे.
भारताने केलेला 341/5 रन्सचा स्कोअर हा महिला वनडे क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा स्कोअर आहे. विशेष म्हणजे, याआधी गेल्या महिन्यात दिल्लीमध्ये याच ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध भारत 369 रन्सवर ऑलआऊट झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.