WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

WC Semifinal: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आयसीसी महिला विश्वचषक उपांत्य सामना खेळला गेला. या सामन्यात स्मृती मानधनाची विकेट पडल्यानंतर मोठा वाद निर्माण झालाय.
Confusion at Wankhede! Smriti Mandhana’s wicket triggers chaos during the Women’s World Cup semifinal between India and Australia.
Confusion at Wankhede! Smriti Mandhana’s wicket triggers chaos during the Women’s World Cup semifinal between India and Australia.
Published On
Summary
  • भारत-ऑस्ट्रेलिया महिला विश्वचषकात राडा

  • थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाज आणि ग्राउंड रेफरी दोघेही गोंधळले

  • मानधनाच्या विकेटवरून चाहते नाराज

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक उपांत्य सामना मुंबईत खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३३८ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची काहीशी खराब राहिली. चुरशीचा असलेल्या सेमीफायनलच्या सामन्यात स्मृती मानधनाच्या विकेटवरून राडा झाला.

आजच्या सामन्यात फलंदाजी करताना स्मृती मानधना चांगल्या फॉर्ममध्ये होती. तिने २४ धावा केल्या. पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात किम गार्थची चेंडू मंधना बाद झाली. मात्र या विकेटवरून चांगलाच राडा झाला. एका वाईड जाणाऱ्या चेंडूवर स्मृती मंधनाला बाद ठरवण्यात आलं. चेंडू लेग साईडनं जाणाऱ्या चेंडू थेट विकेटकिपरच्या हातात गेला. स्टंपच्या मागे उभ्या असलेल्या कॅप्टन हिलीने कॅचसाठी अपील केले. मात्र मैदानावरील पंचांनी बाद देण्यास नकार दिला. हिलीने रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला. मानधनाला पूर्णपणे आत्मविश्वास होता ती की बाद नाही. ते तिच्या देहबोलीवरून स्पष्ट होत होतं.

समालोचकानेही बाद नसल्याच म्हटलं होतं. चेंडू बॅटला लागला नाही. कोणताही आवाज आला नसल्याचं म्हटलं. मात्र जेव्हा तिसऱ्या पंचांनी अल्ट्रा एजने पुष्टी केली तेव्हा मानधनाच्या बॅट आणि चेंडूचा संपर्क दिसून आला. बाद दिल्यानंतरही मानधनाने म्हटले, "मी बरोबर आहे, मला काहीही लागले नाही." इतकेच नाही तर तिसऱ्या पंचाच्या निर्णयाने मैदानावरील पंच लॉरेन एजेनबाग यांनाही आश्चर्य वाटले. त्यांनी बॅट आणि चेंडू यांच्यात कोणताही संपर्क झाला नाही हे दाखवण्यासाठी हातवारे केले.

या निर्णयाने कॉमेंट्री बॉक्समधील खेळाडूंनाही आश्चर्य वाटले. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही स्पष्ट स्पर्श झाला नाही. तहीही अल्ट्रा एज लागल्याचं सांगण्यात आलं आणि मानधनाला बाद देण्यात आले. मैदान सोडतानाही मानधनाने कर्णधार हरमनप्रीतला सांगितले की ती बाद नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com