ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वयाच्या 38 व्या वर्षी, रोहित शर्माने आयसीसी वनडे रॅकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवले. संपूर्ण करिअरमध्ये पहिल्यांदाच रोहितने आयसीसीच्या रॅंकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवले.
रोहित शर्माने गेल्या वर्षी कर्णधार म्हणून टी-20 विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला.
कर्णधार म्हणून, रोहित शर्माने याच वर्षी मार्चमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला विजय मिळवून दिला.
रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वाखाली भारताला केवळ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून दिली नाही तर त्यालाअंतिम सामन्यात प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कारही मिळाला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्माने दमदार फलंदाजी करत प्लेयर ऑफ द सीरीजचा पुरस्कार जिंकला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्मा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. तिसऱ्या वनडे सामन्यात शानदार शतक ठोकत त्याने संपूर्ण मालिकेत 202 धावा केल्या.
वयाच्या 38 व्या वर्षी, सर्व युवा फलंदाजांमध्ये, रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत सर्वाधिक 5 षटकार मारणारा फलंदाज बनण्याचा विक्रम केला.