

आयसीसी विमेंस वर्ल्डकपमध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरी सेमीफायनल रंगली होती. या सामन्यात अखेर भारताने ऑस्ट्रेलियाच्या टीमचा पराभव करत इतिहास रचला आहे. या विजयासह टीम इंडियाच्या मुलींना फायनलमध्ये धडक मारली आहे. फायनल सामन्यात भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.
३३९ रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. प्रतीका रावलच्या दुखापतीनंतर टीममध्ये परतलेली शेफाली वर्मा फक्त १० धावांवर बाद झाली. त्यानंतर १०व्या ओव्हरमध्ये स्मृती मंधानाही २४ रन्सवर माघारी परतली. पण या कठीण परिस्थितीत कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी डाव सावरला.
हरमनप्रीत आणि जेमिमा या दोघींनी जबरदस्त पार्टनरशिप करत १८व्या ओव्हरमध्ये भारताचा स्कोअर शंभराच्या पुढे नेला. या जोडीने १६७ रन्सची शतकी भागीदारी केली. मात्र ३६व्या ओव्हरमध्ये हरमनप्रीत ८९ रन्सवर बाद झाली आणि भारताला तिसरा धक्का बसला.
यानंतर दीप्ती शर्मानेही चांगली खेळी केली. पण ४१व्या ओव्हरमध्ये ती २४ धावांवर रनआऊट झाली. दुसऱ्या टोकाला मात्र जेमिमा ठामपणे उभी राहिली. तिने ११५ चेंडूत शानदार शतक ठोकलं आणि भारताच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. अखेरीस तिने अमनज्योत सोबत भारताला विजय मिळवून दिला
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.