BCCI On Day Night Test : BCCI चा मोठा निर्णय! भारतात 'पिंक बॉल'टेस्ट खेळण्यावर घालणार बंदी; काय आहे कारण?

Jay Shah On Pink Ball Test Future: जगभरात पिंक बॉल कसोटी सामने खेळले जात असतानाही भारताने मात्र पिंक बॉल कसोटी सामन्यांचे आयोजन करण्यावर पाठ फिरवली आहे.
team-india
team-indiasaam tv news
Published On

BCCI On Day Night Test In India :

कसोटी क्रिकेटमध्ये नवीन क्रांती घडून आली होती. जेव्हा लाल चेंडू ऐवजी गुलाबी रंगाचा चेंडू आणि कसोटी सामने दिवस-रात्र स्वरुपात खेळवले जाऊ लागले. मात्र भारतात पिंक बॉल कसोटी सामन्यांचं भविष्य धोक्यात असल्याची चिन्ह दिसून येत आहेत.

जगभरात पिंक बॉल कसोटी सामने खेळले जात असतानाही भारताने मात्र पिंक बॉल कसोटी सामन्यांचे आयोजन करण्यावर पाठ फिरवली आहे. भारतीय संघाला आतापर्यंत केवळ ४ पिंक बॉल कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी पत्रकारांशी संवाद साधताना असं सांगितलंय की,बीसीसीआय आता पिंक बॉल कसोटीसाठी उत्सुक नाही. कारण ४-५ दिवस चालणारे सामने केवळ २ ते ३ दिवसात संपतात. (Day Night Test Matches)

'पिंक बॉल कसोटी (Pink Ball Test) फॉरमॅटला क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रसिद्ध करण्यासाठी बीसीसीआयकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. मात्र ५ दिवस चालणारे पिंक बॉल कसोटी सामने हे अवघ्या २-३ दिवसात संपले आहेत. लोकांना ४-५ दिवस चालणारे कसोटी सामने पाहण्याची सवय आहे. शेवटच्या पिंक बॉल कसोटी सामन्याचे आयोजन ऑस्ट्रेलियात केले गेले होते. त्यानंतर कुठल्याही देशाने पिंक बॉल कसोटी सामन्याचे आयोजन केलेलं नाही.' असं जय शाह म्हणाले. (Latest sports updates)

team-india
IND vs SA T20I Series: भारत-द.आफ्रिका सामना रद्द होताच टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! मोठं कारण आलं समोर

पिंक बॉल कसोटीत कसा राहिलाय भारतीय संघाचा रेकॉर्ड?

भारतीय संघाचा पिंक बॉल कसोटीतील रेकॉर्ड पाहिला तर, भारतीय संघाने आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने ३ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर एका सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

भारताचा संघ श्रीलंकेविरुद्ध शेवटचा पिंक बॉल कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. हा सामना देखील ३ दिवसात समाप्त झाला होता. भारतीय महिला संघाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांना आतापर्यंत केवळ १ सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा कसोटी सामना अनिर्णित राहिला होता.

team-india
IND vs SA: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमधील पहिला T20 सामना पावसामुळे रद्द, आता दुसरा सामना कधी?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com