MI vs RR, IPL 2024: बुमराह ते जयस्वाल.. मुंबई- राजस्थान सामन्यात या ४ खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा

MI vs RR, Players To Watch Out In MI vs RR Match: आता तिसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ राजस्थान रॉयल्स संघाचा सामना करताना दिसून येणार आहे. गेले २ सामने गमावलेल्या मुंबई इंडियन्स संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे.
jasprit bumrah to yashasvi jaiswal key players to watch out in mi vs rr ipl 2024 match mumbai indians vs rajasthan royals match
jasprit bumrah to yashasvi jaiswal key players to watch out in mi vs rr ipl 2024 match mumbai indians vs rajasthan royals matchtwitter

Key Players To Watch Out In MI vs RR Match:

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला आयपीएल २०२४ स्पर्धेत साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या सामन्यात मुंबईला गुजरात टायटन्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर पुढील सामन्यात मुंबई इंडियन्सला सनरायझर्स हैदराबादकडून दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं.

आता तिसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ राजस्थान रॉयल्स संघाचा सामना करताना दिसून येणार आहे. गेले २ सामने गमावलेल्या मुंबई इंडियन्स संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे.

या खेळाडूंच्या कामगिरीवर असेल सर्वांची नजर...

हार्दिक पंड्या...

गेल्या २ हंगामात हार्दिक पंड्याने गुजरात टायटन्स संघाचं नेतृत्व केलं. त्याने पहिल्या हंगामात गुजरातला चॅम्पियन बनवलं तर दुसऱ्या सामन्यात गुजरातला फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. मात्र आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी त्याच्याकडे मुंबई इंडियन्स संघाचं कर्णधारपद देण्यात आलं आहे.

jasprit bumrah to yashasvi jaiswal key players to watch out in mi vs rr ipl 2024 match mumbai indians vs rajasthan royals match
MS Dhoni Record: IPL मध्ये धोनीचा महारेकॉर्ड! 'शतक' पूर्ण करत रचला इतिहास

मात्र त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. सलग २ सामने गमावल्यानंतर त्याच्या नेतृत्वावर टीका केली जात आहे. तर दुसरीकडे जसप्रीत बुमराहसारखा अनुभवी गोलंदाज असताना तो स्वत: पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला. यावरुन देखील त्याला जोरदार ट्रोल केलं गेलं.

jasprit bumrah to yashasvi jaiswal key players to watch out in mi vs rr ipl 2024 match mumbai indians vs rajasthan royals match
CSK vs DC,IPL 2024: विजयानंतर दिल्लीला मोठा धक्का! रिषभ पंतची ही चूक पडली महागात

संजू सॅमसन...

संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणारा राजस्थान रॉयल्सचा संघ आयपीएल २०२४ स्पर्धेत शानदार कामगिरी करतोय. या संघाने सलग २ सामने जिंकले आहेत. राजस्थानचा पुढील सामना वानखेडेच्या मैदानावर होणार आहे. या मैदानावर त्याच्याकडून फलंदाजीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. यासह राजस्थान रॉयल्सचा संघ विजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

जसप्रीत बुमराह..

मुंबईचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह राजस्थान रॉयल्स संघातील फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरु शकतो. हा सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना अतिरिक्त उसळी मिळते.त्यामुळे तो सुरुवातीच्या षटकांमध्ये राजस्थान रॉयल्स संघाला मोठे धक्के देऊ शकतो.

यशस्वी जयस्वाल..

यशस्वी जयस्वाल सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. नुकताच भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेचा थरार पार पडला. या मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. मात्र ती कामगिरी तो आयपीएल स्पर्धेत करु शकलेला नाही. सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये त्याला हवी तशी खेळी करता आलेली नाही. यशस्वी जयस्वाल राजस्थानकडून खेळत असला तरीदेखील वानखेडे स्टेडियम हे त्याचं होम ग्राऊंड आहे. त्यामुळे तो नक्कीच या मैदानावर कमबॅक खेळी करु शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com