Punjab Kings highest successful run chase IPL history : श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्सने अरुण जेटली स्टेडियमवर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावांचा यशस्वी पाठलाग केला. दिल्ली कॅपिटल्सने उभारलेला २६४ धावांचा डोंगर पंजाब किंग्सने यशस्वीपणे पार केला. दिल्लीकडून केएल राहुल याने वादळी फलंदाजी करत पंजाबसमोर डोंगराऐवढं आव्हान ठेवले होते. पण श्रेयस अय्यर, प्रभसिमरन आणि प्रियांश आर्या यांच्या वादळी फलंदाजी करत विजय खेचून आणला. पंजाबने आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंतचा सर्वात मोठा धावसंख्या पाठलाग करण्याचा आपलाच विक्रम मोडला.
२६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच दिल्लीच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. सलामीवीर प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्या यांनी पॉवरप्लेमध्येच सामना पंजाबच्या बाजूने झुकवला. फक्त ६ षटकात १२० पेक्षा जास्त धावांचा डोंगर उभारला होता. प्रभसिमरन आणि प्रियांश आर्या तंबूत परतल्यानंतर श्रेयस अय्यर याने मोर्चा संभाळला. श्रेयस अय्यरने पंजाबला विजय मिळवून दिला. दिल्लीकडून केएल राहुल याने १५२ धावांची वादळी खेळी केली. पराभवानंतरही दिल्लीच्या केएल राहुल याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पंजाबच्या फलंदाजांनी मैदानाच्या चहूबाजूंनी फटकेबाजी करत अशक्य वाटणारे लक्ष्य गाठले. प्रभसिमरन याने १७ चेंडूत ४३ धावांचा पाऊस पाडला. तर प्रभसिमरन याने फक्त २६ चेंडूत ७६ धावांची वादळी खेळी केली. दोघांनी प्रत्येकी ५-५ षटकार ठोकले. श्रेयस अय्यर याने ३६ चेंडूत ७१ धावांची शानदार खेळी केली. यामध्ये ७ षटकारांचा समावेश होता. पंजाबच्या फलंदाजीपुढे दिल्लीच्या गोलंदाजांनी गुडघे टेकले. लुंगी एनगिडी दुखापतग्रस्त झाल्यामुळे दिल्लीची गोलंदाजी कमकुवत दिसत होती. त्याचाच फायदा पंजाबच्या फलंदाजांनी घेतला.
दिल्लीच्या फलंदाजांनी पंजाबच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत दिल्लीने पंजाबसमोर मोठे लक्ष्य ठेवले. दिल्लीच्या डावात फलंदाजांनी चौकार आणि षटकारांची आतिषबाजी केली. केएल राहुलने ६७ चेंडूत १५२ धावांचा पाऊस पाडला. यामध्ये ९ षटकार आणि १६ चौकारांचा समावेश होता. तर नितेश राणा यानेही ४४ चेंडूत ९१ धावांचा पाऊस पाडला, यामध्ये ४ षटकार आणि ११ चौकार लगावले. दिल्लीच्या फलंदाजांसमोर अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल आणि मार्को यान्सन यांसारखे दिग्गज गोलंदाजही अपयशी ठरले. पंजाबच्या जवळपास सर्वच गोलंदाजांनी १० पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. अर्शदीप आणि बार्टलट यांना विकेट घेण्यात यश आले असले, तरी ते धावा रोखण्यात अपयशी ठरले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.