IPL 2025: आयपीएल अखेर स्थगित, BCCI चा मोठा निर्णय; भारत-पाकिस्तान तणावाचा क्रिकेटवरही परिणाम

IPL 2025 Suspension: भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाची परिस्थिती असून कोणत्याही क्षणी युद्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. अशातच बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे.
IPL 2025 Suspension
IPL 2025 SuspensionSAAM TV
Published On

सध्या भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव दिसून येतोय. याचा परिणाम क्रिकेटवरही होताना दिसतोय. दरम्यान, देशात आयपीएल पुढे ढकलल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयकडून यंदाची आयपीएल स्थगित करण्यात आली आहे.

गुरुवारी धर्मशालामध्ये झालेला सामनाही भारत आणि पाकिस्तानमधील युद्धामुळे थांबवण्यात आला होता. आता वाढत्या तणावामुळे आयपीएल स्थगित करण्यात आल्याने चाहत्यांच्या आनंदावर विरजण पडलं आहे.

IPL 2025 Suspension
IPL 2025 वर भारत-पाक युद्धाचं सावट, पंजाब विरुद्ध दिल्ली सामना रद्द; पुढे काय होणार?

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शुक्रवारी आयपीएल २०२५ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयनेही या विषयावर केंद्र सरकारशी चर्चा केली आणि नंतर हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे

IPL 2025 Suspension
IPL 2025: भारत-पाक‍िस्तान तणावामुळे रद्द होणार IPL? आजचा LSG विरूद्ध RCB सामना खेळवला जाणार का?

पीटीआयशी बोलताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिलीये. या अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार, "देशात युद्धाची परिस्थिती आहे तरीही देशात क्रिकेट खेळलं जातंय हे योग्य वाटत नाही." आयपीएल २०२५ चा अंतिम सामना २५ मे रोजी कोलकातामध्ये होणार होता. तर दुसरीकडे पाकिस्तान सुपर लीग (PSL) चे उर्वरित सामने UAE मध्ये हलवण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com