IPL 2025: भारत-पाक‍िस्तान तणावामुळे रद्द होणार IPL? आजचा LSG विरूद्ध RCB सामना खेळवला जाणार का?

IPL 2025 be suspended: सध्या भारत पाकिस्तान यांच्यात तणावाचं वातावरण आहे. भारतात आयपीएलचे सामने खेळवले जात असून याचा घटनेचा परिणाम आयपीएलवर पडण्याची शक्यता आहे. यामध्ये आयपीएल रद्द केली जाणार का हा प्रश्न सर्वांसमोर आहे.
IPL 2025 be suspended
IPL 2025 be suspendedsaam tv
Published On

एकीकडे आयपीएलचे सामने सुरु आहेत आणि दुसरीकडे भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव सुरु आहे. त्यामुळे आता आयपीएल रद्द केली जाणार का अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) बैठक झाली. आज बीसीसीआय आयपीएल २०२५ बद्दल अंतिम निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे.

भारत पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव असताना बीसीसीआयची पहिली प्राथमिकता परदेशी खेळाडूंना घरी पाठवणं ही असणार आहे. आज आयपीएलमध्ये लखनऊच्या एकाना स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांच्यात सामना होणार आहे. अशा परिस्थितीत, हा सामना होईल की नाही हा प्रश्न उपस्थित होताना दिसतोय.

IPL 2025 be suspended
Rohit Sharma: इंग्लंड दौऱ्यासाठी तयार होता रोहित; मग अचानक का घेतली निवृत्ती? 'हे' आहे कारण

भारत-पाकिस्तान तणावामुळे ८ मे रोजी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना मध्येच रद्द करण्यात आला. धर्मशाळेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन (HPCA) स्टेडियम रिकामं करण्यात आलं. यावेळी खेळाडूंना धर्मशाळाहून दिल्लीला आणण्यासाठी एक विशेष ट्रेन सोडण्यात आली. बीसीसीआयने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना प्राधान्याने आणण्यासाठी वंदे भारत ट्रेनची व्यवस्था केली होती.

नॉर्दन रेल्वेच्या सीपीआरओनेही यांनी केलेल्या विधानानुसार, पंजाब आणि दिल्लीच्या आयपीएल टीम्सना घेऊन जाण्यासाठी पठाणकोटहून दिल्लीला एक विशेष ट्रेन चालवली जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव, त्याच्या वेळेची आणि मार्गाची माहिती दिली गेली नाही.

IPL 2025 be suspended
IPL 2025 वर भारत-पाक युद्धाचं सावट, पंजाब विरुद्ध दिल्ली सामना रद्द; पुढे काय होणार?

भारत-पाकिस्तानच्या तणावावर बीसीसीआयचं विधान

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव देवजीत सैकिया यांनी गुरुवारी सध्याच्या परिस्थितीवर एक निवेदन दिलं. ते म्हणाले, सर्व काही लक्षात घेऊन आम्ही हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या परिस्थिती चांगली नाही, म्हणूनच आम्ही ८ मे चा सामना रद्द केला आहे. शेजारी देश परिस्थिती आणखी बिघडवण्याचा प्रयत्न करतोय. खेळाडू, प्रेक्षक आणि सपोर्ट स्टाफची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. राष्ट्राच्या हितासाठी जे काही असेल ते आम्ही करू. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि त्यानुसार निर्णय घेतला जाईल.

IPL 2025 be suspended
India-Pakistan War : ‘आंख के बदले आंख…’ अरे रायडू काय बोलून बसला... भारत-पाक तणावात वादग्रस्त पोस्ट

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चे अध्यक्ष अरुण धुमाल यांनी सांगितलं की, लीग सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी सरकारच्या निर्देशांची वाट पाहत आहे. परंतु सध्या लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील शुक्रवारी होणारा सामना टाईमटेबलनुसार होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com