India-Pakistan War : ‘आंख के बदले आंख…’ अरे रायडू काय बोलून बसला... भारत-पाक तणावात वादग्रस्त पोस्ट

India-Pakistan War : माजी भारतीय खेळाडू अंबाती रायडू याची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. रायडूने एक्सवर ‘आंख के बदले आंख…’ असे पोस्ट करत वाद ओढावून घेतला.
India-Pakistan War
India-Pakistan War Saam Tv News
Published On

India-Pakistan War News in Marathi :भारत-पाकिस्तान तणावादरम्यान अंबाती रायडू याने केलेली पोस्ट वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. अंबाती रायडूच्या एक्स पोस्टमुळे सोशल मीडियात संतापाची लाट उफळली आहे. पाकिस्तान भारतावर हल्ला करत आहे, त्याला भारताकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. पाकड्यांच्या नापाक हरकतीमुळे प्रत्येक भारतीय नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. पाकिस्तान भारताच्या सीमाभागात हल्ला करत असतानाच माजी क्रिकेटर अंबाती रायडू (Ambati rayudu controversial) याने केलेल्या एका पोस्टमुळे खळबळ उडाली.

भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थितीत माजी भारतीय क्रिकेटपटू अंबाती रायडू याच्या एका पोस्टने सोशल मीडियावर खळबळ माजवली. An eye for an eye makes the world blind... अशी पोस्ट रायडूने एक्सवर केली. या पोस्टमुळे सोशल मिडियावर खळबळ उडाली. डोळ्याच्या बदल्यात डोळा फोडल्यामुळे जग आंधळं होईल, अशी पोस्ट अंबाती रायडूने केली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाची परिस्थिती असताना रायडूने केलेल्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करण्यात आली.

रायडू याच्या या ट्वीटवरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली. काहींनी रायडूला देशद्रोही म्हटलेय. तर काहींनी भारतीय सैन्याच्या मनोबलावर परिणाम करणारे स्टेटमेंट असल्याचा आरोप केलाय. सोशल मीडियावरील एका युजर्सने म्हटले की, पाकिस्तानने हद पार केली, तेव्हा लढणे हाच पर्याय होता. रायडू हे ज्ञान आता का देतोय? दुसरीकडे, काहींनी रायडू यांच्या शांततेच्या आवाहनाचे समर्थन केले, परंतु त्याच्या वेळेच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले.

India-Pakistan War
Operation Sindoor : पाकड्यांनी १५ शहरांना टार्गेट केलं, भारताने ड्रोन हल्ला हाणून पाडला | VIDEO

२२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये भ्याड हल्ला केला. यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर देशात एकच संताप व्यक्त करण्यात आला होता. दहशतवाद्याच्या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. भारताने पाक आणि पीओके मधील दहशतवाद्याची ९ तळे नष्ट केले. यामध्ये ७० दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर पाकड्याने सात आणि आठ तारखेला भारतावर हल्ला केला. भारतानेही चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानला अद्दल घडवली. दोन्ही देशातील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रायडू याचे ट्वीट संवेदनशील ठरले आहे. रायडू याच्यावर टीकेची झोड उडाली आहे.

India-Pakistan War
Operation Sindoor : भारताच्या ऑपरेशन 'सिंदूर'मुळे अमेरिकेची चिंता वाढली, पाकिस्तानात राहणाऱ्या अमेरिकन नागरिकांना लाहोर सोडण्याची सूचना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com